न संपलेला माणूस (कविता)
न संपलेला माणूस -१- बातमी शहरभर धुक्यासारखी पसरली डॉक्टर गेले कुणीतरी गोळ्या झाडल्या त्यांच्यावर. सर्वत्र सन्नाटा मग कुजबुज.....चर्चा. ज्योती म्हणाली, "आज रक्षाबंधन नाही. गेलं पाहिजे मला साताऱ्याला कार्यकर्त्यांसोबत. " एक उत्तेजित गृहस्थ म्हणाले, ''सारखी सारखी टीका करायची आमच्या धर्मावर किती सहन करायचं? पापाचा घडा भरला होता त्यांचा मुक्ती मिळेल त्यांना धर्मरक्षकाच्या हातून मृत्यू म्हणजे बाकीच्यांनी शहाणं व्हावं आता.'' कार्यकर्ते जमून होते एकत्र राख पांघरून धुमसत होते आतल्या आत. -२- तीन छोट्या मुली खेळत होत्या मध्येच एक म्हणाली, ''डॉक्टर मेले.....म्हणजे मारले त्यांना कुणीतरी म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांना मरायचं नव्हतं, तरी ते मेले त्यांच्या अनेक इच्छा बाकी असतीलच ना! मग ते आता भूत होतील की ...