पोस्ट्स

संत त्रिलोचन भक्ती परंपरांना जोडणारा दुवा

इमेज
                भक्ती ही द्रविडी परंपरा असून ती दक्षिणेकडून उत्तरेकडे गेली, असे मानले जाते. दक्षिण उत्तरेच्या मध्यावर पंढरपूर अर्थात वारकरी भक्तिपरंपरा आहे. मध्ययुगातील महत्त्वाचे जागते भक्तिकेंद्र म्हणून पंढरपूर उभे राहिले आणि येथे भक्तीचा मेळा जमला. वारकरी संतांनी दक्षिण व उत्तर भारतात यात्रा केल्या. आपल्या भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार केला. भक्तीचे पसायदान ठिकठिकाणी वाटले. त्यातूनच नवे संत कवी पुढे आले. संत त्रिलोचन हे त्यापैकीच एक.         त्रिलोचन म्हणजे तीन डोळे असणारा. परंतु येथे त्रिलोचन म्हणजे त्रिकाल ज्ञानी! भूत, भविष्य आणि वर्तमानाचे लख्ख ज्ञान असणारा तो त्रिलोचन! संत त्रिलोचन यांचे लौकिक चरित्र उपलब्ध नाही. ते संत नामदेवांचे समकालीन होते. बाबा पूरणदास कृत 'श्री नामदेव चरित्रा'मध्ये त्रिलोचनाची कथा आलेली आहे. प्रियादासाने 'भक्तमाल' मध्ये त्यांच्यासंबंधी कथा नोंदवून त्यांना श्रेष्ठ भक्तांच्या पंगतीत बसविले आहे. श्री महिपती बुवा रचित 'संतलीलामृत' ग्रंथात सत्ताविसाव्या अध्यायात त्रिलोचन व ...

महापरिनिर्वाण

इमेज
महापरिनिर्वाण          मित्रहो, बौद्ध तत्त्वज्ञानात निर्वाण व महापरिनिर्वाण या दोन भिन्न भिन्न संकल्पना आहेत. निर्वाण या अर्थाने पाली भाषेत निब्बाण असा शब्द वापरला जातो. सर्वप्रथम आपण या दोन संकल्पनांमधील भेद समजून घेऊ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकात निर्वाण प्राप्ती संदर्भात सविस्तर भाष्य केलेले आहे.        निर्वाणप्राप्ती ही मनुष्याने जीवित असतानाच करावयाची गोष्ट आहे. तर परिनिर्वाण म्हणजे निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीचा सुखकर मृत्युसोहळा होय. निर्वाण प्राप्त करणे हाच धम्म आहे. निर्वाणासारखे सुखकर काहीही नाही, असे बुद्धांनी सांगितले आहे. बुद्धांनी सांगितलेल्या सर्व सिद्धांतांच्या केंद्रस्थानी निर्वाण सिद्धांत आहे. ‘निब्बाणं परमं सुखं’ असे धम्मपदात (२०३-२०४) म्हटले आहे व ह्यालाच बुद्ध सर्वांत श्रेष्ठ (अवस्था) असे मानतात. ‘निब्बाणं परमं वदन्ति बुद्धा’ (धम्मपद १८४). बुद्धांनी सांगितलेले निर्वाण हे पूर्वसुरींनी सांगितलेल्या निर्वाणापेक्षा अर्थ आणि आशयदृष्ट्या भिन्न आहे. बुद्धांच्या पूर्वव...

संत एकनाथ लिखित संतचरित्रे

इमेज
संत एकनाथ लिखित संतचरित्रे          वारकरी संप्रदाय म्हणजे पूर्वपरंपरेशी केलेली स्वयंसिद्ध बंडखोरी! संत नामदेव-ज्ञानदेवांच्या काळात संप्रदायाला आचार विचार देण्याचे महद कार्य झाले. ते करत असताना संप्रदायात सर्वश्रेष्ठ स्थान म्हणून संतपद गौरविले गेले. वारकरी संप्रदायातील संत हे अनुभवसिद्ध आणि आदर्श कर्मयोगी होते. त्यांनी स्वतःचा व्यवसाय उद्योग केलाच, परंतु त्यासोबतच आपल्या सभोवताली अज्ञान अंधकारात बुडणाऱ्या लोकांविषयी कळवळा जपला. त्यांना सन्मार्ग दाखविला. ईश्वराशी कसे नाते जोडायचे ते शिकविले. 'यज्ञ याग विधी वायाची उपाधी', असे म्हणत आचरणसुलभ भक्तिमार्ग सांगितला. प्रयत्नपूर्वक वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. या संतांनी लिहिलेले वाङ्मय म्हणजे संप्रदायाला दिलेली आधारशीला होय. तत्कालीन सनातनी ब्रह्मवृंद या संतांना त्रास देत होता. छळत होता. त्यांच्या योग्यतेबद्दल शंका उपस्थित करीत होता. अशावेळी संत मंडळींची भलामन करणे गरजेचेच होते. म्हणून वारकरी संप्रदायातील संतांनी जाणीवपूर्वक आपल्या संतमंडळाचा गौरव केलेला दिसतो. ज्ञानेश्वरादी भावंडां...

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप       स्मार्टफोन ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक क्रांतीच म्हणावी लागेल. त्यामुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट सुविधेचा वापर करणे सहज सोपे झाले. त्या पाठोपाठ अनेक प्रकारचे सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांच्या वापराचे पर्याय खुले झाले. यामध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, telegram, व्हिडिओ चॅनल, युट्युब, रिल्स, फेसबुक अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यातीलच एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ब्लॉग होय. सामान्यतः ज्या काळात छापील मासिके नियतकालिके निघत होती व अन्य पर्याय उपलब्ध नव्हते, त्या काळात फक्त मान्यवर गणले जाणारे लेखकच लिहू शकत होते आणि त्यांचे लेखन प्रकाशित होऊ शकत होते. सोशल मीडियाच्या काळात लिहायची उर्मी व इच्छाशक्ती असणारी प्रत्येक व्यक्ती लिहू लागली व तत्काळ विविध समाजमाध्यमांचा वापर करून प्रकाशित तसेच प्रसारित करू लागली. यामध्ये ब्लॉग लेखन हा सहज उपलब्ध होणारा चांगला पर्याय आहे.         ब्लॉग या शब्दाला मराठीत अनुदिनी किंवा जालपत्रिका किंवा जालनिशी असे पर्यायी शब्द आहेत. ब्लॉग (blog) हा शब्द वेब (web+log) लॉग...

कथाकथी (Story Telling)

कथाकथी (Story Telling)               गोष्टी रंगवून सांगणे आणि ऐकणे हे पूर्वापार चालत आलेले लोकसंचित आहे. गोष्टीवेल्हाळ माणसे नेहमीच इतरांना आवडतात. त्यांच्याकडे घटना, प्रसंग शब्दांच्या माध्यमातून साक्षात उभे करण्याचे सामर्थ्य असते. स्टोरी टेलिंग या इंग्रजी शब्दांसाठी मराठीत मात्र तीन भिन्न कृती अस्तित्वात असलेल्या दिसतात. त्या पुढील प्रमाणे : गोष्ट सांगणे             ही लोक परंपरेतील लोकप्रिय पद्धती आहे. अनेक जण सांगोवांगीच्या गोष्टी एकमेकांना ऐकवत असतात. यातील काही अनुभव खरे, काही खोटे असतात. मूळ घटनेला तिखट मीठ लावून रंजक बनविले जाते. या गोष्टींमधून नीती शिकविली जाते. बोध दिला जातो. या सांगितलेल्या लोककथा असतात. दंतकथा असतात. प्राणीकथा किंवा भुताखेताच्या गोष्टी देखील असतात. कधी कधी दैवतकथा देखील रंगवून सांगितल्या जातात. या सगळ्या गोष्टींचा कर्ता म्हणजेच लेखक अज्ञात असतो. एका अर्थी या गोष्टी म्हणजे समूहाची निर्मिती असते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे लोककथांचे व दंतकथांचे संचित पोचविले जाते. समाजातील बुजुर्ग माण...

मराठी कादंबरी सूची : संशोधकांचा वाटाड्या

इमेज
मराठी कादंबरी सूची : संशोधकांचा वाटाड्या सूची व कोश वाङ्मय यांचे साहित्य अभ्यासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण कोणतीही साहित्यकृती किंवा लेखक यांचा सुटा सुटा विचार करता येत नाही. तसा अभ्यास करताना त्या वाङ्मय प्रकाराची साहित्यपरंपरा, विविध कालखंड, त्या कालखंडात प्रभावी असणाऱ्या विचारधारा, इझम यांचाही विचार करावा लागतो. लेखक आणि त्याची साहित्यकृती हे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन पर्यावरणाचे अपत्य असते. त्यामुळेच साहित्याचा समग्रदर्शी अभ्यास महत्त्वाचा ठरतो. अशा कामात जर विविध प्रकारच्या सूची उपलब्ध असतील, तर अभ्यासकाला सोयीचे होते आणि त्याचे संशोधनाचे काम गतीने होऊ शकते. या दृष्टीने विचार करता प्रा. डॉ. विनोद राठोड यांनी साकारलेली मराठी कादंबरी सूची प्रारंभ ते २०२३ ही अत्यंत महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. जवळजवळ दहा हजार कादंबऱ्यांची नोंद या सूचीमध्ये आहे. अनेक अपरिचित लेखक व त्यांच्या विस्मरणात गेलेल्या कादंबऱ्यांची नोंद या सूचीमध्ये आढळते. त्या दृष्टीने हा सूची ग्रंथ महत्वपूर्ण आहे. विशेषतः एम. फिल., पीएच.डी.चे संशोधक, वाङ्मयेतिहास लेखक, अभ्यासक यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणारा...