गोडसे@गांधी.कॉम (नाट्य समीक्षा)

गोडसे@गांधी.कॉम भारतीय नाट्य साहित्यात हिंदीची एक स्वतंत्र व प्रभावी परंपरा आहे. अनेक प्रतिभावंत नाटककारांच्या नाटकांचे प्रयोग हिंदीबरोबरच अन्य भारतीय भाषांमध्येही खेळले गेले आहेत. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही हिंदी नाटकांनी आपला एक ठसा उमटवला आहे. मोहन राकेश, हबीब तनवीर, भीष्म साहनी, शंकर शेष, सर्वेश्वरदयाल सक्सेना, सुरेंद्र वर्मा अशा काही प्रमुख नाटककारांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. आपल्या अनोख्या शैलीने आणि नाविन्यपूर्ण मांडणीने बहुचर्चित झालेले हिंदीतील एक महत्त्वाचे नाटककार म्हणजे असगर वज़ाहत होय. फिरंगी लौट आये, इन्ना की आवाज़, वीरगती, समिधा, जिस लाहौर नई देख्या ओ जम्याइ नई, अकी, गोडसे@गांधी.कॉम , पाकीटमार रंग मण्डल अशी त्यांची आठ नाटके प्रसिद्ध आहेत. त्यापैकी 'समिधा' हे नाटक त्यातील धर्म चिकित्सेच्या आशयामुळे रंगमंचावर येऊ शकले नाही, तर 'जिस लाहौर...' या नाटकाने त्यातील मानवतावादी दृष्टिकोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर असगर वज़ाहत यांचे नाव नेले. ' गोडसे@गांधी.कॉम ' हे त्यांचे बहुचर्चित ठरलेले माइलस्टोन म्...