शाळेच्या परिसरातच सापडताहेत फुगे (कविता)

*शाळेच्या परिसरातच सापडताहेत फुगे* शाळा आता आतील रंगरूपासह बदलत आहे मूल्यांना धरून ठेवणाऱ्या आउटडेटेड म्हातार्यांना काढायचंय भंगारात "मास्तर करतीलच की पास गरज कोणालाय? आमाला का त्यान्ला?" नव्या राजकुमारांचे बेफिकीर प्रश्न. वेगळ्याच चिंता सतावत आहेत विद्यार्थ्यांना गळणारे/रंग बदलणारे केस, मुरमं, त्वचेचा पोत फिगर, इम्प्रेशन आणि पर्सनॅलिटीच्या. अभ्यासात लक्षच लागत नाही त्यांचं की लाज वाटत नाही थोडीही स्वतःला न येणाऱ्या गोष्टींविषयी कॉपी-पेस्टच्या आधारानं पोरं प्रोजेक्ट बनवताहेत समृद्ध जीवनाचा. फर्निचरच्या आतून वाळवी पोखरत नेते आख्खं घर तशी सडवलीय ही व्यवस्था अभद्र विचारांनी. एज्युकेशन इंडस्ट्रीतल्या शिक्षणसम्राटांनी सुरू केली आहे नागवणूक गुरुदेव कार्यकर्त्यांचीच अन् भुकटीत मिसळलेले पाणी दूध समजून पिताहेत अश्वत्थामे. प्रपोज कार्ड देऊन पोरं करताहेत विचारणा प्रेमाची पोरी धडाधड उतरताहेत "आय एम यंगेज!" किंवा हातावर मिरवत आहेत अनेक 'फ्रेंडशिप बँड'. आता मुलींनाही मोबाईलवर हव्या आहेत 'तसल्य...