श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास व्यक्तिमत्त्व विकास हा आज परवलीचा शब्द झाला आहे. व्यक्तिमत्त्वात व्यक्तीचे बाह्यदर्शन आणि त्याच्या आंतरिक क्षमता यांना महत्त्व असते. अांतरिक क्षमतांच्या जडणघडणीत म्हणजेच पर्यायाने व्यक्तिमत्त्व विकासात भाषेचे स्थान अनन्यसाधारण आहे. भाषा ही माणसाने निर्माण केलेली अभूतपूर्व संरचना! मानवी विकासात भाषेला मैलाचा दगड मानता येईल. भाषांची निर्मिती आणि लिपींचा शोध यामुळे माणूस वेगाने प्रगती करू लागला. त्याने स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण जीवनमान विकसित केले. त्यामुळेच मानवी जीवनात भाषेला प्रचंड महत्त्व असलेले दिसते. भाषा शिकणे किंवा आत्मसात करणे म्हणजे भाषिक कौशल्यांचा विकास करणे होय. व्यक्तीने स्वत:मध्ये भाषिक कौशल्ये विकसित केल्यानंतर आपोआपच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्याचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होऊ लागते. श्रवण, भाषण, वाचन, लेखन व संभाषण ही भाषिक कौशल्ये मानली जातात. या भाषिक कौशल्यांचा विकास साधून व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत राह...
ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप स्मार्टफोन ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक क्रांतीच म्हणावी लागेल. त्यामुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट सुविधेचा वापर करणे सहज सोपे झाले. त्या पाठोपाठ अनेक प्रकारचे सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांच्या वापराचे पर्याय खुले झाले. यामध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, telegram, व्हिडिओ चॅनल, युट्युब, रिल्स, फेसबुक अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यातीलच एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ब्लॉग होय. सामान्यतः ज्या काळात छापील मासिके नियतकालिके निघत होती व अन्य पर्याय उपलब्ध नव्हते, त्या काळात फक्त मान्यवर गणले जाणारे लेखकच लिहू शकत होते आणि त्यांचे लेखन प्रकाशित होऊ शकत होते. सोशल मीडियाच्या काळात लिहायची उर्मी व इच्छाशक्ती असणारी प्रत्येक व्यक्ती लिहू लागली व तत्काळ विविध समाजमाध्यमांचा वापर करून प्रकाशित तसेच प्रसारित करू लागली. यामध्ये ब्लॉग लेखन हा सहज उपलब्ध होणारा चांगला पर्याय आहे. ब्लॉग या शब्दाला मराठीत अनुदिनी किंवा जालपत्रिका किंवा जालनिशी असे पर्यायी शब्द आहेत. ब्लॉग (blog) हा शब्द वेब (web+log) लॉग...
छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अस्मिता व अभिमान मिळवून देणारे छ. शिवराय हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. शून्यातून विश्व निर्माण करण्याचा पराक्रम त्यांनी केला. एका पराक्रमी जहागीरदाराच्या मुलगा म्हणून सुरुवात केली आणि स्वतःचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हे करताना राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या प्रेरणेचा आणि राजे शहाजी महाराजांच्या संकल्पाचा त्यांना उपयोग झाला. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची ठरली त्यांची विचारसरणी त्यांचे दृष्टिकोन. अठरापगड जातीचे गोळा केलेले मावळे, त्यांच्यामध्ये भरलेला आत्मविश्वास, या बळावरच शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवराज्याचे वैशिष्ट्य असे की ते आधुनिक कालखंडातील लोकशाही व्यवस्थेत महत्त्वाचे वाटत आहे. शिवाजी महाराजांनी घेतलेले निर्णय स्वराज्यासाठी घालून दिलेले नियम आणि त्यांची राजनीती आजही आपणास मार्गदर्शक ठरावी अशीच आहे. या राजनीतिच्या आधारे पुढे मराठ्यांनी राज्य केले. आपले स्वराज्य अटकेपा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा