गोष्टी वेल्हाळ अण्णा (लेख)
गोष्टी वेल्हाळ अण्णा आम्हाला आठवी किंवा नववीच्या वर्गात इंग्रजीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर एक धडा होता. त्यातलं पहिलंच वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं. Anna, the elder brother...! त्या कर्मवीरांना आम्ही फक्त पुस्तकातूनच वाचलं आहे. परंतु आम्ही कर्मवीरांचे शिक्षणप्रेम आणि त्याग आमच्या अण्णांच्या म्हणजेच प्रा. सदानंद श्रावस्ती सरांच्या व्यक्तिमत्त्वात अनुभवला आहे. इयत्ता नववीच्या वर्गात असताना माझी रवींद्र कल्लाप्पा शिंगे या मुलाशी मैत्री मैत्री कल्लाप्पा शिंगे या मुलाशी मैत्री मैत्री जमली. आमच्या गुरू क्लासेस मधला तो सर्वात हुशार विद्यार्थी. मी अभ्यासात कच्चा. 'ढ' या श्रेणीत बसणारा, तर रवींद्र सगळीकडे अव्वल . सुंदर हस्ताक्षर, प्रभावी संभाषण कौशल्य, वक्तृत्व-काव्यलेखन-काव्यवाचन स्पर्धांमध्ये बक्षिसांचा मानकरी तोच आणि अभ्यासातही प्रथम! शेकडो अद्भुत पिसांचे वैभव मिरवणाऱ्या मोरासारखा तो रुबाबदार. त्याला या सगळ्या गोष्टी कशा जमतात, हा सगळ्या मुला-मुलींना पडलेला प्रश्न! एकदा त्याच्या घरी गेलो. तिथे अण्णांची भेट झाली. मग मी मनात समजून गेलो, बहरलेल...