श्रमण परंपरा आणि वारकरी संत - डॉ. श्यामसुंदर मिरजकर

*श्रमण परंपरेचे वारकरी संत* वारकरी संत हे विविध जातींमधून पुढे आले आणि त्यांनी स्वतःची जाती विशिष्ट परिभाषा भक्ती वाङ्मयात प्रतिष्ठित केली. त्यांची ही वाङ्ममयीन कृती मराठी भाषेवर, संस्कृतीवर दीर्घकालीन प्रभाव टाकणारी होती. आपापल्या जात व्यवसायाच्या पर्यावरणासह अध्यात्माच्या गहन क्षेत्रात पाय घट्ट रोवून उभे ठाकणे सहज सोपे नव्हते. ही भाषिक बंडखोरी केल्यामुळे संतांच्या वाट्याला अपमान, अवहेलना, कुचेष्टा, छळ आणि शिक्षा या गोष्टी आल्या. परंतु संत आपल्या निर्धारित ध्येयापासून ढळले नाहीत. इतके साहस आणि अंगीकृत कार्यावरील दृढ श्रद्धा त्यांनी कुठून प्राप्त केली असावी? त्यांच्या अभंगातून जात व्यवसायाची परिभाषा सहज उस्फूर्तपणे अभिव्यक्त झाली की त्यामागे हेतुपूर्वकता आहे? त्यांना जात व्यवसायाचा अभिमान आहे की जाती अभिमान मोडून नवा समाज घडवायचा आहे? असे काही प्रश्न सहजच आपल्यासमोर अवतरतात. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपणाला थोडे भारताच्या धार्मिक इतिहासात डोकावून पाहावे लागेल. भारताचा धार्मिक इतिहास हा श्रमण...