पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वीर वारीकर संत नामदेव - डॉ. श्यामसुंदर मिरजकर

इमेज
* वीर वारीकर संत नामदेव *      महाराष्ट्र भूमीत प्रवर्तित झालेला वारकरी संप्रदाय म्हणजे प्रगल्भ बंडखोरीचा नवा आयाम! सगळे संत हे या वारकरी पंथाचे शिल्पकार! समाजाच्या बहिष्कृत जात वर्गातून हे संत पुढे आले. स्वतःच्या अलौकिक प्रज्ञेने त्यांनी नवा आचार-विचार दिला. त्याला वास्तव अनुभवाची जोड दिली. जनसामान्यांची दिशाभूल करणारे, शोषण करणारे कर्मकांड, धार्मिक आचार-विचार त्यांनी नाकारले. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा, ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य जर श्रमजीवी बहुजनांना अज्ञानी अपात्र ठरवून धर्मक्षेत्राच्या बाहेर ठेवत असेल आणि त्यांना त्रैवर्णिकांची सेवा करा हाच तुमचा विहित धर्म आहे, असे सांगत असेल, तर ते नाकारणेच हिताचे असा विचार करून स्वतःचा स्वतंत्र उपासना मार्ग निर्माण करणे श्रेयस्कर, असे या संतांनी मानले. त्यातून श्री विठ्ठल हे दैवत, पंढरी हे क्षेत्र, चंद्रभागा हे तीर्थ यांना प्रमाण मानणारे वारकरी घडले. या वारकरी संप्रदायातील आद्य संत म्हणजे संतश्रेष्ठ नामदेव महाराज होय.          वस्तुतः श्री विठ्ठल हा गोपजनांचा देव. पंढरपूरचा प्र...