पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झुंड : व्यवस्थेची दगडी भिंत पारदर्शक बनविणारा सिनेमा

इमेज
व्यवस्थेच्या दगडी भिंतीला पारदर्शक करणारा सिनेमा : झुंड        हम को दुनिया ने रोज देखा है        फिर भी अनदेखा झुंड है।        हम न जिंदा थे, हम न मरते है        लोग कहते है, झुंड है। या गाण्याच्या ओळी आहेत दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'झुंड'  चित्रपटातल्या. एक असे जग, जे आपल्या आजूबाजूला सतत अस्तित्वात आहे, परंतु आपण त्याची दखल घेत नाही. दुर्लक्ष करतो. उपेक्षा करतो. आपण त्यांचे श्रम घेतो, पण माणसं नाकारतो. जगण्यासाठी दररोज संघर्ष आणि भागदौड करणारा हा वर्ग घाणीत कष्टतो. घामात भिजतो. व्यसनात बुडतो. आणि बेवारस होऊन संपून जातो. समाजव्यवस्थेच्या तळच्या जातवर्गातून आलेली ही 'झुंड' शहरांच्या तथाकथित सौंदर्याला गालबोट लावणाऱ्या झोपडपट्टीत राहते. पलीकडेच एक चकचकीत आकर्षक नीटनेटका वर्ग कॉलनी, सोसायटी आणि अपार्टमेंटच्या टॉवरमध्ये राहतो. तो शाळा, कॉलेज आणि मॉल संस्कृतीत वाढलेला शायनिंग इंडिया आहे. कष्टणारा भारत आणि शायनिंग इंडिया यांच्या दरम्यान एक उंच भिंत ...