'शब्दांची रोजनिशी': हरवत चाललेल्या भाषा व संवादाचे नाटक

'शब्दांची रोजनिशी' : हरवत चाललेल्या भाषा व संवादाचे नाटक भाषा हे संपर्क व संवादाचे साधन असते, हे मुळातच अर्धसत्य विधान आहे. त्यासोबतच भाषा हे सांस्कृतिक आक्रमणाचे, लपवाछपवीचे, भासमान वास्तव निर्मितीचे साधन आहे, हेच खरे! लेखन तंत्र, छपाई, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया अशा सगळ्या प्रगतीच्या पायऱ्या आपण चढत जात असताना अनेक लोकसमूह आपली भाषा गमवत आहेत. नव्हे आपल्या मागील सगळ्या पिढ्यांचे लोकसंचित गमवत आहेत. हळूहळू जुन्या पिढीतील लोक आणि त्यांच्या सोबतच भाषा मारू लागल्या आहेत. याचे एक गंभीर भान देणारे नाटक 'शब्दांची रोजनिशी' काल पाहिले. रामू रामनाथन या लेखकाने इंग्रजीमध्ये लिहिलेले 'द डायरी ऑफ अ वर्ड' हे नाटक अमर देवगांवकर यांनी मराठीत अनुवादित केले आहे. तर त्याचा अत्यंत उत्तम प्रयोग दिग्दर्शक अतुल पेठे आणि नायिका केतकी थत्ते यांनी सादर केला आहे. कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात काल या नाटकाचे दोन प्रयोग सादर झाले. मोजकेच नव्वद-शंभर प्रेक्षक. नाटकावर मनस्वी प्रेम करणारे. आणि समोर नाटकघर, पुणे यांचा नाटक समरसून जगणारा र...