पोस्ट्स

२०२३ मधून प्रकाशित झालेला लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संत बहेणाबाई : वैराग्य विवेकाचा ज्ञानदीप

इमेज
*संत बहेणाबाई : वैराग्य विवेकाचा ज्ञानदीप*      प्रपंचाच्या खडतर मार्गावरून वाटचाल करत वारकरी संप्रदायातील विवेकदीप शोधणाऱ्या संत कवयित्री म्हणून बहेणाबाई यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संत तुकाराम हे या संप्रदायाचे कळस असतील, तर बहेणाबाई त्यावरील फडकती ध्वजा आहे. ब्राह्मण परिवारात झालेला जन्म. अगदी बालपणी म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेला विवाह, तोही तीस वर्षांच्या एका बिजवराशी. पती म्हणजे साक्षात जमदग्नीचा अवतार. शीघ्रकोपी. घरची अत्यंत गरिबी. भिक्षुकी करून उदरनिर्वाह चाललेला. असे असले तरी वर्णजाती अभिमान आणि पुरुषी वर्चस्वभावना ओतप्रोत भरलेली. रोजचा दिवस म्हणजे अग्निदिव्य, असे प्राक्तन असताना बहेणाच्या मनी अध्यात्माची तीव्र ओढ जागते. कथा प्रवचनात तिचे मन रमते. ती देवलसी आहे, असे सगळे म्हणतात. भजन कीर्तनात दंगणारी, सात्त्विक आचरण करणारी, मनाने हळवी, प्रांजळ आणि भावनाशील असणारी बहेणाबाई भक्तीचे खरे वर्म शोधू लागते. तिला ते सापडते कोल्हापुरात जयराम स्वामी यांच्या कीर्तनात. जयराम स्वामींनी आपल्या कीर्तनात तुकोबांची महती गायलेली असते. त्यांची वचने उद्धृत ...