शाळेच्या परिसरातच सापडताहेत फुगे (कविता)
*शाळेच्या परिसरातच सापडताहेत फुगे*
शाळा आता आतील रंगरूपासह बदलत आहे
मूल्यांना धरून ठेवणाऱ्या आउटडेटेड म्हातार्यांना काढायचंय भंगारात
"मास्तर करतीलच की पास
गरज कोणालाय? आमाला का त्यान्ला?"
नव्या राजकुमारांचे बेफिकीर प्रश्न.
वेगळ्याच चिंता सतावत आहेत विद्यार्थ्यांना
गळणारे/रंग बदलणारे केस, मुरमं, त्वचेचा पोत
फिगर, इम्प्रेशन आणि पर्सनॅलिटीच्या.
अभ्यासात लक्षच लागत नाही त्यांचं
की लाज वाटत नाही थोडीही
स्वतःला न येणाऱ्या गोष्टींविषयी
कॉपी-पेस्टच्या आधारानं पोरं प्रोजेक्ट बनवताहेत समृद्ध जीवनाचा.
फर्निचरच्या आतून वाळवी पोखरत नेते आख्खं घर
तशी सडवलीय ही व्यवस्था अभद्र विचारांनी.
एज्युकेशन इंडस्ट्रीतल्या शिक्षणसम्राटांनी
सुरू केली आहे नागवणूक गुरुदेव कार्यकर्त्यांचीच
अन् भुकटीत मिसळलेले पाणी दूध समजून पिताहेत अश्वत्थामे.
प्रपोज कार्ड देऊन पोरं करताहेत विचारणा प्रेमाची
पोरी धडाधड उतरताहेत "आय एम यंगेज!" किंवा
हातावर मिरवत आहेत अनेक 'फ्रेंडशिप बँड'.
आता मुलींनाही मोबाईलवर हव्या आहेत 'तसल्या क्लिप्स'
अन् शाळेच्या परिसरातच सापडताहेत निरोधचे फुगे
'मुला-मुलीत करू नका भेद, करा मुतारी एक', अशा घोषणा रंगताहेत भिंतीवर
युवक महोत्सवानंतर व्हरांड्यात सांडलेले रेत पुसायला शिपाई तयार नाहीत
अन् शिक्षकांना प्रचंड टेन्शन आलंय वाढणाऱ्या पोटाचं नि टकलाचं.
आता ज्ञान सर्वत्र सर्वांसाठी खुल्या बाजारात खुलं आहे
जातिवंत शेतकरी पाहताहेत वाट अस्सल गिऱ्हाईकाची
दुष्काळात जपून ठेवलेलं अस्सल वाणाचं बी त्यांनी मांडलंय विकायला
संपूर्ण बी-मोड होण्यापूर्वी त्यांना ते द्यायचंय मातीच्या हातांना
मेंदूची मशागत करून
जोमदार रसरशीत पीक काढायची आस अजून संपली नाही!
- श्यामसुंदर मिरजकर
भोवतलाचा वास्तव अविष्कार सुंदर
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाधन्यवाद सुतार सर
हटवाShamsunder khup chan kavita
उत्तर द्याहटवावास्तवाचे ज्वलंत चित्रण
उत्तर द्याहटवाधाडसी अर्थपूर्ण आणि निर्दोषही....👍👎🙏
उत्तर द्याहटवाअस्वस्थ करुन सोडणारी कविता. वास्तवावर नेमकेपणानं बोट ठेवणारी. मेंदूच्या मशागतीची गरज अधोरेखित करणारी!
उत्तर द्याहटवाधर्मवीर खरं आहे आपलं म्हणणं
हटवाअस्वस्थ करुन सोडणारी कविता. वास्तवावर नेमकेपणानं बोट ठेवणारी. मेंदूच्या मशागतीची गरज अधोरेखित करणारी!
उत्तर द्याहटवाया विषयावर कवितेच्या माध्यमातून बोलता येते याची जाणीव निर्माण होते. खूप छान आहे कविता.
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम
हटवाआरपार..एक्सरेच...
उत्तर द्याहटवासर आजच्या वास्तव मर्मावर तुम्ही शब्द रूपी बोट ठेवलं आहे.खूप मार्मीक विचार मांडले आहेत.
उत्तर द्याहटवाअत्यंत मार्मिक !
उत्तर द्याहटवाअत्यंत भीषण वास्तव अतिशय परखडपणे मांडले आहे. या भ्रष्ट व्यवस्थेत आपल्यासारखी संवेदनशील माणसं व्यथित झाल्याशिवाय राहणेच शक्य नाही.
उत्तर द्याहटवाखरं आहे हे मॅडम
हटवासुंदर आणि अर्थपूर्ण...खरे वास्तव आहे
उत्तर द्याहटवासर कविता अप्रतिम झालेली आहे . आजच्या भीषण वास्तवावरती अतिशय परखडपणे आपण भाष्य केलेले आहे. तुम्ही जे मांडलेले आहे ते वास्तव आज सर्वत्र दिसत आहे .बआणि त्यामुळे खरोखर मेंदूची मशागत करण्याची गरज आहे
उत्तर द्याहटवाहोय सर आपल्याला मेंदूची मशागत करावीच लागेल
हटवाहे वास्तव एका ग्रामीण मॅडम कडून मी पाच-सहा वर्षापूर्वी ऐकलेले आहे.. विद्यादान परिसरातील एक काळी बाजू....
उत्तर द्याहटवाही कविता देखिल सहा-सात वर्षांपूर्वीची आहे
हटवाभीषण वास्तव...हल्ली मुलगा मुलगी कोणी असो डोळ्यासमोर नसतील तर जीवाला घोर असतो सर...आमची पिढी खूप मागची नसली तरी हे असलं काही आमच्यावेळी नव्हतं असं म्हणायची वेळ आली आहे��
उत्तर द्याहटवाखरं आहे मॅडम
हटवाकविता छान आहे वाचली face book var
उत्तर द्याहटवावास्तव...... अत्यंत मार्मिक!
उत्तर द्याहटवाअस्वस्थ करणारा भवताल तुम्ही अस्वस्थ मनाने नेमक्या शब्दात चितारलाय
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवावा.. खूपच छान. वास्तव अचूक मांडलंय. आजूबाजूला आपल्या काही अंतरावर हे भयानक घडतेय... बरोबर टिपलात...
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुखदेव
हटवाअगदी खरंय.. आजच्या शिक्षणव्यवस्थेची दुखरी नस नेमकी पकडलीय तुम्ही. अस्वस्थ करतेय कविता. हेच तर काम असतं तिचं. मन:पूर्वक शुभेच्छा !
उत्तर द्याहटवाखरं आहे अगदी
हटवासर, जे सत्य तुम्हा आम्हाला जाणवते ते तुम्ही मांडलेत. पण बाहेरच्या जगाला बुध्दी भ्रष्ट झालेल्यांना ते कितपत रूचेल सांगता येत नाही. पण ही अस्वस्थता सर्वांची आहे. पण मांडायला पुढे कोण येत नाही. तुम्ही ती मांडलीत.
उत्तर द्याहटवारोटे सर आपला अनुभव सर्वत्र सारखाच आहे
हटवाखर बोलणं आणि सागणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही असच धाडसान लिखाण करण आज आवश्यक आहे. अशीच माझी इच्छा आहे. खुपच छान कविता लिहिली. वास्तव माडलत .आभारी आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद वकील साहेब
हटवाखर बोलणं आणि सांगणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही असच धाडसानं लिखाण करणं आज आवश्यक आहे. अशीच माझी इच्छा आहे. खुपच छान कविता लिहिली. वास्तव माडलत .आभारी आहे.
उत्तर द्याहटवावास्तवाला नेमकेपणाने पकडलंय...मोजक्याच प्रतिमाविश्वातून हे वास्तव मांडलं असलं तरी आणि अंगावर येणारं असलं तरी ते आजचं वास्तव आहे...त्यामुळे अस्वस्थता साहजिकच आहे...
उत्तर द्याहटवावास्तवाला योग्य आकार देणे गरजेचे वाटते निलेश
हटवाफारच सुंदर कविता आहेत. मनापासून अभिनंदन.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवासर्व परिस्थिती डोकं सुन्न करणारी आहे ... पण काय करायचं वास्तव परिस्थिती आहे .... हे बदलायला हवं.
उत्तर द्याहटवाआपण आपल्या परीने प्रयत्न करायचे याशिवाय पर्याय नाही
हटवावास्तव आहे आणि ते भयानकही आहे
उत्तर द्याहटवाडॉक्टर साहेब मेडिकल क्षेत्रात वेगळीच परिस्थिती असेल असे वाटते
हटवाअतिशय मार्मिक कविता
उत्तर द्याहटवाहाडाच्या शिक्षकांची कुचंबणा पण आपण दाखवलीत
धन्यवाद लक्ष्मण
हटवासौ.अश्विनी माने-जाधव.
उत्तर द्याहटवाहेलावून टाकणार्या परिस्थितीला खुप सुंदररित्या मांडलत सर.🙏🏻
खरं आहे
हटवाभीषण,वास्तव,परखड आणि डोके सुंद करणारी,विचार करायला भाग पाडणारी अस्वस्थ कविता,,,,,
उत्तर द्याहटवाभीषण,वास्तव,परखड आणि डोके सुंद करणारी,विचार करायला भाग पाडणारी अस्वस्थ कविता,,,,,
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवावाचकांना अस्वस्थ करणारी कविता...भविष्याची चिंता करायला लावणारी...
उत्तर द्याहटवाही अस्वस्थताच लिहायला भाग पाडते
हटवाव्याकूळ करणारी कविता...
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम
हटवाआजच्या वास्तवावर परखड पणे लिखाण केलेली कविता.
उत्तर द्याहटवाखरं आहे प्रशांत
हटवासर, आत्ताच फेसबुकवर कविता वाचली. खूप खरीखुरी. नामदेवराव ढसाळांची आठवण झाली.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाडाँ. किरण वाघमारे, अकोला
उत्तर द्याहटवाभयानक पण सत्य वास्तव आहे.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर
हटवासर, कविता खूप छान आहे. पण जमाना हायब्रीडचा आहे. आज मूल्य दिल्यावरच मूल्यशिक्षण देण्याऱ्यांची नियुक्ती होते.खांद्यावरून पोरांना नेऊन शाळेत बसवले जायचे, तिथेही आज बसचे मूल्य आधी भरावे लागते. ते नाही भरले म्हणून, शाळेबाहेर पडणाऱ्या पोराला पाहून खांद्यावरून नेणाऱ्यांचा "आमचे स्फूर्तिस्थान" म्हणत उभारलेल्या पुतळ्याचा डोळ्यातही पाणी येते. पोरांना सुसंस्कृत बनवताना धाक लावायला आम्ही जीभ उचलू शकत नाही कारण आम्ही सुरुवातीला दिलेले मूल्य मिळण्यात आमचा रस असतो... पोर चेकाळतो, वावग वागतो, त्याला अडवायचं कस?... पैसे घेऊन का होईना नोकरी देणाऱ्याच त्यात पोर असते... मग बदल आणायचा कोणी हा प्रश्नही कोंबडी आधी कि अंड? इतकाच गहाण बनतो...
उत्तर द्याहटवाअश्या वातावरणातही सकारात्मकता जपायलाच हवी.... कोणी पोपेरेंची राहीबाई अस्सल बियाणं जपतीय... अन कोणीतरी सेंद्रिय शेतीचा आग्रह धरतोय... तोवर असे फुगे दिसत राहतील... टाळायचा प्रयत्न करू या... कधीतरी हा काळोख मिटेल, अशी आशा ठेवू या ... तोवर आपण विझायच नाही... मिटायचं तर नाहीच नाही...
वास्तव मांडलत सर...
आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यामुळे खूप बरे वाटले. प्रत्येक क्षेत्रात राहीबाई असलीच पाहिजे. सकस बियाणं जपणं ही काळाची गरज आहे. तुकोबांनी म्हटलेच आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी।।
हटवाकविता वाचून सर मन सुन्न झालं!
उत्तर द्याहटवाधन्यवाद विजय
हटवाखूप वास्तवदर्शी कविता.कवितेच्या शेवटी थोडा हात फिरवायला पाहिजे असे वाटते.
उत्तर द्याहटवाविचार करतो मॅडम
हटवाआपण जबाबदारीने लिहीत आहात वास्तव परखड पणे मांडत आहात या धडसाबद्दल आपले आभार कविता अस्वस्थ जबाबदार शिक्षक आणि पालक कवितेतून व्यक्त होतो ज्याची आज नितांत गरज आहे खूप छान अभिनंदन
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप खूप छान कविता आहे सर संपूर्ण वास्तवतेचे चित्र उभे राहते
उत्तर द्याहटवाLeft utmost speechless.
उत्तर द्याहटवाIt's not a poem but a small epic of almost ages of ages and the dclining social ehics and still man's attempt to show what is happening is right in the world, where intellectuals are not allowed to open mouths against set patterns and they, seeing everything with closed eyes.
Very naked, still unspoken, all encompassimg truth is revealed though a fewer words.
The poem is based upon the truth. Accept it or deny it, it makes no difference to the system.
Still it makes difference to human beings. Are we they?