पोस्ट्स

परीक्षण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पर्यावरण जाणिवा विकसित करणारी बालकादंबरी

इमेज
पर्यावरण जाणिवा विकसित करणारी बालकादंबरी                    'एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' ही नामदेव माळी लिखित बालकादंबरी अफलातून आहे. मोठ्याने आरवणारा कोंबडा गब्रू आणि त्याच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून सांगणारे वृद्ध जोडपे यांच्या संघर्षाभोवती ही कादंबरी फिरते. खेड्यातून शहरात राहायला आलेली आजी तिच्याबरोबर कोंबड्याही घेऊन येते. त्यामध्ये गब्रू हा रुबाबदार व आक्रमक कोंबडाही असतो. त्याचे मोठ्याने आरवणे कॉलनीतील शेजारच्या वृद्ध दांपत्याला त्रासदायक वाटते. त्यातून नवा प्रश्न निर्माण होतो. दिवसेंदिवस शहरांमधून संवेदनशीलता हरवत चालली आहे. प्रत्येकाला दुसऱ्याचा त्रास नको आहे. परंतु आपल्या सवयींमुळे/वागण्यामुळे इतरांना त्रास होतो, याची किंचितही जाणीव त्यांना नसते. अशा पार्श्वभूमीवर निसर्ग संवेदना, भूतदया, मानवता, जगण्याचे व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करत ही कादंबरी पुढे जाते.                गौरव हा छोटा मुलगा आणि त्याचे सृजन कट्ट्यावरील म...

स्त्री मनाच्या खोल गाभाऱ्यात प्रवेशणाऱ्या कथा : आत आत आत

इमेज
स्त्रीमनाच्या खोल गाभाऱ्यात प्रवेशणाऱ्या कथा : आत आत आत        मराठी साहित्यात विभावरी शिरूरकरांपासून निरजा किंवा प्रज्ञा दया पवार पर्यंत अनेक लेखिकांनी स्त्रीविश्वाचे आतील पदर व्यक्त केले आहेत. तरीही अद्याप स्त्रीजीवनातील अनेक अनुभव आणि त्यांच्या भावविश्वावर होणारे परिणाम अस्पर्शित आहेत. अमृता देसर्डा यांनी आपल्या कथांमधून अशा अस्पर्शित अनुभवविश्वाचे दर्शन घडविले आहे. कथेच्या प्रांतात भाऊ पाध्ये, प्रकाश नारायण संत, किरण गुरव सारख्या कथाकारांनी बालमानस प्रगल्भपणे चित्रित केले आहे. मात्र बालिका मानस क्वचितच आलेले आढळते. अमृताच्या अनेक कथांमधून हे बालिका मानस चित्रित झाले आहे. खरे तर, आपल्याकडे बाल संगोपनाकडे म्हणावे तितके गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. आपल्या मुलांशी सुसंवाद राखण्या ऐवजी त्यांना उपदेशाचे डोस पाजणे किंवा दोष देणे यातच पालक मश्गुल झालेले असतात. त्यामुळे अनपेक्षितपणे लैंगिक अनुभवाला सामोरे जावे लागणाऱ्या मुलींना नीटपणे समजून घेतले जात नाही. त्यातून गंभीर पेच प्रसंग किंवा समस्या निर्माण होतात. त्याचे चित्र अमृताच्या अनेक कथांमधून आ...