पोस्ट्स

प्रासंगिक लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गोष्टी वेल्हाळ अण्णा (लेख)

    गोष्टी वेल्हाळ अण्णा  आम्हाला आठवी किंवा नववीच्या वर्गात इंग्रजीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर एक धडा होता. त्यातलं पहिलंच वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं. Anna, the elder brother...! त्या कर्मवीरांना आम्ही फक्त पुस्तकातूनच वाचलं आहे. परंतु आम्ही कर्मवीरांचे शिक्षणप्रेम आणि त्याग आमच्या अण्णांच्या म्हणजेच प्रा. सदानंद श्रावस्ती सरांच्या व्यक्तिमत्त्वात अनुभवला आहे.      इयत्ता नववीच्या वर्गात असताना माझी रवींद्र कल्लाप्पा शिंगे या मुलाशी मैत्री मैत्री कल्लाप्पा शिंगे या मुलाशी मैत्री मैत्री जमली. आमच्या गुरू क्लासेस मधला तो सर्वात हुशार विद्यार्थी. मी अभ्यासात कच्चा. 'ढ' या श्रेणीत बसणारा, तर रवींद्र सगळीकडे अव्वल . सुंदर हस्ताक्षर, प्रभावी संभाषण कौशल्य, वक्तृत्व-काव्यलेखन-काव्यवाचन स्पर्धांमध्ये बक्षिसांचा मानकरी तोच आणि अभ्यासातही प्रथम! शेकडो अद्भुत पिसांचे वैभव मिरवणाऱ्या मोरासारखा तो रुबाबदार. त्याला या सगळ्या गोष्टी कशा जमतात, हा सगळ्या मुला-मुलींना पडलेला प्रश्न! एकदा त्याच्या घरी गेलो. तिथे अण्णांची भेट झाली. मग मी मनात समजून गेलो, बहरलेल...

आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी (लेख)

आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी        ज्येष्ठ-आषाढ महिना म्हणजे 'पाऊस पाणी आबादानी' म्हणण्याचा महिना! आकाशात भरल्या ढगांच्या राशींवर राशी चढत जातात. 'मल्हार महुडे गगनी दाटले', अशी अवस्था होते. भरून आलेलं  निळं सावळं आभाळ आणि वैशाख वणव्यात तापून तगमगलेली काळी धरित्री यांच्या मीलनाला समृद्ध सुख सोहळ्यात रूपांतरित करण्यासाठी शेतकरी कष्टत असतो. आकाशातल्या काळ्यासावळ्या मेघराजाला हात जोडतानाच या बळीवंताच्या हृदयात पंढरीच्या विठुरायाची मूर्ती जागी झालेली असते. मग शेतकामातून उसंत मिळताच, 'भेटी लागी जीवा लागलिसे आस' अशी त्याची अवस्था होते. खरे तर घरच्या देव्हार्‍यात हा काळा सावळा विठू असतोच. गावात त्याचे छोटे साधे मंदिरही असते. दर एकादशी द्वादशीला तिथे भजन रंगते. परंतु पंढरीची ओढ ही अनावर असते. विठू सगळीकडे सारखाच पण देव- स्थळ-तीर्थ आणि भक्त एकवटलेली पुण्यवंत भूमी म्हणजे पंढरी. या पंढरीत येऊन मनोभावे दर्शन घेतल्याशिवाय वारकऱ्यांच्या मनाचे समाधान होत नाही. 'आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी' अशी श्रद्धा असणारे वारकरी मैलोन् मैल चालत, हरिनामाचा गजर करत, संतांचे अ...

आषाढी कार्तिकी विसरू नका मज

आषाढी कार्तिकी विसरुं नका मज         वैशाख वणवा संपता संपता शेतीची मशागत सुरू होते. रान नांगरून तयार केले जाते. तापलेल्या भुईला पावसाची ओढ असते. ज्येष्ठात पेरणीची लगबग आणि पाऊस सुरू होतो. आषाढात बाळकोळपण होते. पीक तरारतं. वीत दीड वीत वर येतं. कामाची धांदल थांबते. त्याच वेळी महाराष्ट्र-कर्नाटकच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या श्री विठ्ठलाच्या वीर वारीकरांना आषाढी वारीचे वेध लागतात. माणसांची जमवाजमव, साधनांची जुळवाजुळव सुरू होते. नव्या चैतन्याने लोक भारतात. लोकसखा विठ्ठलाच्या भेटीची आस मनामनात दुणावते. 'चल ग सखे चल ग सखे पंढरीला' अशी साद एकमेकींना घातली जाते. आणि अंतराचा, मुक्कामांचा अंदाज घेत एक एक दिंडी पंढरीच्या दिशेने निघू लागते. 'जय जय राम कृष्ण हरी', या नामघोषात संतांचा गौरव करत एका लयीत पावलं उचलली जातात. टाळ-मृदंगाचा नाद घुमू लागतो. 'माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी', म्हणत लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या भेटीला वारकरी धावू लागतात.         महाराष्ट्रात प्रतिवर्षी दिसणारे हे चित्र. दरवर्षी लाखो भाविक चालत पंढरीच्या दिशेने निघतात. ना कुणाचे बोल...