शेवटचा श्वास असेपर्यंत... (कविता)

शेवटचा श्वास असेपर्यंत... 

कुठून कसा प्रवेश करतो व्हायरस
शरीरात...मनात...मेंदूत...
कळत नाही
पण गती रोखून धरतो जगण्याची

अचानक समोर असणाऱ्या सप्तरंगी दृश्यात
कुणीतरी काळा रंग भरून टाकावा गडद
तसे होते
काळजाची स्पंदने, हृदयाचे ठोके
नेहमीपेक्षा मोठेच वाटू लागतात
नजरेसमोर तरळतात प्रिय प्रिय चेहरे
वाटते,
या प्रियजनांना आता मी कुठे आणि कसा भेटणार
की वेळ आली आहे निरोप घेण्याची...?

राहून गेल्या आहेत बऱ्याच गोष्टी करायच्या एकत्र
अनेकांचं कर्ज आहे माझ्या नावावर
तेही फेडायचय जसं जमेल तसं
प्रामाणिकपणे

अजून खूप सारं जगणंच जगायचं आहे
इतक्यातच काळोखाने काळ होऊन
दात विचकून कसे चालेल...!

दूरवरून ऍम्ब्युलन्सच्या सायरनचे स्वर ऐकू येतात
रात्री-अपरात्री मी धडपडत जागा होतो
जीव दपडतो...
श्वास गुदमरत राहतो रक्तातून...प्राणातून
मी जिवाच्या आकांताने हात पुढे करतो मदतीसाठी
लांबूनच माझ्यावर लक्ष ठेवून असणारा डॉक्टर मित्र
सतत बजावत राहतो
आहे...मी आहे...घाबरू नकोस
आणि सोडत राहतो
माझ्या धमनीत संजीवनी सलाईन

खूप दुरून कुठून कुठून येत आहेत संदेश आपुलकीचे...मायेने ओथंबलेले
कानावर पडत आहेत करूण काळजीचे स्वर
जणू सगळेच सांगत आहेत
हिम्मत हरून कसे चालेल
खेळात ज्याच्यावर डाव आला
त्याने तो पूर्ण केलाच पाहिजे
निसटले पाहिजे शत्रूच्या तावडीतून सहीसलामत

काळजाच्या कप्प्यांमध्ये
अनेक प्रियजनांचे चेहरे डोकावतात
आणि सतत समोर उभी ठाकते सखी
हातात हात घेऊन
दोन चिमण्या पाखरांना सोबतीला घेऊन

मी दीर्घ झोपेतून जागा झाल्यासारखा
त्यांना बिलगतो
आणि म्हणतो,
थांबून कसे चालेल
आपल्याला करायचा आहे प्रवास एकमेकांच्या संगतीने
आणि खूप सारे आप्तमित्र आहेतच ना पुढेमागे
त्यांना साद घालत
हाकेला प्रतिसाद देत
आपण चालत राहू सूर्योन्मुख होऊन
प्रकाशाच्या दिशेने
आणि 'आपल्यां'ना अधिक आपुलकीने घट्ट धरू
शेवटचा श्वास असेपर्यंत...

                      - श्यामसुंदर मिरजकर


(सप्टेंबरमध्ये कोविड१९ प्रभावात आल्यानंतरची अभिव्यक्ती) 


(अंकाचे मुखपृष्ठ चित्रकार प्रशीक एकनाथ पाटील) 

टिप्पण्या

  1. जगण्या मरण्याच्या हिंदोळ्यावर जिवीगिषू आशेचा चिवट धागा जगण्याची उमेद चिरंजीव असल्याची प्रतीती देतो

    उत्तर द्याहटवा
  2. अनंत अडचणीत ही सकारात्मक ऊर्जा आपली आपण च निर्माण करणारी कविता.

    उत्तर द्याहटवा
  3. विनोद कांबळे हातकणंगले४ जानेवारी, २०२१ रोजी ८:३८ AM

    या कोरोनाच्या महामारीमध्ये सामान्य जनमानसासाच्या मनाची अवस्था छान दर्शवली आहे....

    उत्तर द्याहटवा
  4. डॉ. विजया पवार कराड४ जानेवारी, २०२१ रोजी ८:४० AM

    अभिव्यक्ती अतिशय सुंदर मांडली आहे... संवेदनशीलतेने टिपलय सर..�� आधी वाचली होती आता पुन्हा भावली

    उत्तर द्याहटवा
  5. डॉ. शिवकुमार सोनाळकर, कोल्हापूर४ जानेवारी, २०२१ रोजी ८:४१ AM

    खूप सुंदर कविता...
    कोरोनाकालीन भयान वास्तव शब्दात अचूक पकडलेय...
    आपण चालत राहू सूर्योन्मुख होऊन प्रकाशाच्या दिशेने....
    लाजवाब...!

    उत्तर द्याहटवा
  6. डॉ. लता मोरे, रुकडी४ जानेवारी, २०२१ रोजी ८:४२ AM

    Covid-19 च्या आजाराची भयानकता या कवितेतून अनुभवण्यास मिळाली. अत्यंत मार्मिक शब्दात अनुभव व्यक्त केलेले आहेत. या विश्वातून कोरोना सारखी भयानक साथ/ महामारी निघून जावी आणि सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभावे ही प्रार्थना

    उत्तर द्याहटवा
  7. कुंदा कांबळे, मायणी४ जानेवारी, २०२१ रोजी ८:४४ AM

    मनाचा ठाव घेणारी कविता������������������������

    उत्तर द्याहटवा
  8. तुमची कविता वास्तवाचे धारदार चित्र नजरेसमोर जिवंत करते

    उत्तर द्याहटवा
  9. चंद्रकांत निकम गुंडेवाडी४ जानेवारी, २०२१ रोजी ८:४७ AM

    वाचली.अतिशय आवडली.
    खूप खूप वास्तविकता आहे.
    कोरोना महामारीचा साक्षीदार असल्याने भावस्पर्शी कविता आहे.येणाऱ्या पिढीला भयानकता नक्कीच कळेल आपल्या काव्यातून.

    ��✅��

    उत्तर द्याहटवा
  10. डॉ. महेंद्र कदम, टेंभुर्णी४ जानेवारी, २०२१ रोजी ८:४९ AM

    उत्तम रचना आणि कविता

    उत्तर द्याहटवा
  11. वैशाली त्रिंबके, मायणी४ जानेवारी, २०२१ रोजी ८:५० AM

    सुंदर कविता आहे सर��������

    उत्तर द्याहटवा
  12. नीलम माणगावे, जयसिंगपूर४ जानेवारी, २०२१ रोजी ८:५१ AM

    खरे वास्तव...सुंदर कविता

    उत्तर द्याहटवा
  13. अन्वर हुसेन, इस्लामपूर४ जानेवारी, २०२१ रोजी ८:५२ AM

    सर...काय बोलू ...अगदी असच्या असं वाटत होतं त्या क्षणी..��

    उत्तर द्याहटवा
  14. डॉ. मांतेश हिरेमठ, शिराळा४ जानेवारी, २०२१ रोजी ८:५५ AM

    वर्तमान परिस्थितीत अंतर्मुख करणारी कविता ! खूप सुंदर सर !

    उत्तर द्याहटवा
  15. सर , सुंदर भावभावनांचा गुंता, सहज शब्दातून व्यक्त झालेत . मला कविता फार आवडतात, कळतात , जगण्याची दिशा समजते. अल्पाक्षर रमणीयत्व- कमी शब्दात, मोठा आशय .

    उत्तर द्याहटवा
  16. रवि बावडेकर, इस्लामपूर४ जानेवारी, २०२१ रोजी ८:५९ AM

    जिवंत अनुभव सर...

    उत्तर द्याहटवा
  17. डॉ. निशिकांत मिरजकर, पुणे४ जानेवारी, २०२१ रोजी ९:०२ AM

    छान आहे कविता.

    उत्तर द्याहटवा
  18. दयानंद लिहावे, इचलकरंजी४ जानेवारी, २०२१ रोजी ९:०५ AM

    अगदी आतलं, मनातलं

    मस्त रे

    उत्तर द्याहटवा
  19. आपण स्वतः जगलेले वास्तव कवितेच्या माध्यमातून खूप सुंदर मांडले आहे.

    उत्तर द्याहटवा
  20. सचिन चौधरी निमसोड४ जानेवारी, २०२१ रोजी ९:२६ AM

    आपण स्वतः जगलेले वास्तव कवितेच्या माध्यमातून खूप सुंदर मांडले आहे.

    उत्तर द्याहटवा
  21. डॉ. सुजय पाटील, कोल्हापूर५ जानेवारी, २०२१ रोजी ८:२० AM

    न दिसणाऱ्या विषाणूंची दृश्यमान दहशत मार्मिकपणे मांडलेली आहे.

    उत्तर द्याहटवा
  22. खूप सुंदर वास्तव मांडणारी कविता आहे. हजारो शब्दांच्या आमच्या लेखापेक्षा तुमच्या कवितेतून त्या मनाला भिडतात. खूपच सुंदर कविता

    उत्तर द्याहटवा
  23. कविता खूप छान वाटली कवितेतून मानवी जीवनातील भयानक जगासमोरील वास्तव प्रकट झाले आहेत धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  24. कोविड बाधित व्यक्तीच्या व्यथा मांडल्या आहेत..आणि त्यातून स्वतःला कस सावरायला हवं हे ही छान पद्धतीने मांडल आहे... स्फूर्ती देणारी कविता आहे..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)