पायाखालून हळूहळू निसटत चालली भूमी (कविता)
पायाखालून हळूहळू निसटत चालली भूमी
-------------------------------------------------------
श्वास सुटून चालले आहेत हातातून
आणि मित्रही
नुसत्याच ख्यालीखुशालीच्या गप्पा
मोबाईलची रिंगटोनही धडकी भरविते उरात
अभद्र बातमीच्या आशंकेने
बाहेरून घरी परतल्यावर
मुलं धावत येत नाहीत आताशा
आठवणीने सॅनिटायझरचा स्प्रे पुढे करतात
बिलगत नाहीत आनंदाने
की कुशीत विसावतही नाहीत
चुकून गेलोच मित्राच्या घरी
तर मन कावरेबावरे
ऐसपैस रेलून बसता येत नाही
की मनसोक्त गप्पांची मैफल रंगत नाही
बसून राहतो अंग चोरून
पटकन निघण्याच्या तयारीत चहापाणी नाकारून
भिववितात रात्रंदिवस वाजणारे
ऍम्ब्युलन्सच्या सायरनचे स्वर
आलेच कोणी बाहेरून
तर आतल्या खोलीत जायला सांगतो
आई-वडिलांना दारकोंडी करत
कित्येक दिवस झाले
मरणाऱ्यांना घरातूनच वाहतो आहे श्रद्धांजली
चुटपुटतो जीव
सांत्वनाचे शब्द घशातच अडकतात
हुंदकाच पडतो बाहेर अन् डोळे पावसाळतात
सारख्या सारख्या सूचना
जपून राहा, काळजी घ्या, हे करा, ते करा
इतरांना आणि स्वतःलाही
पायाखालून हळूहळू निसटत चालली भूमी
अंदाज चुकत आहेत सगळेच
व्यवहाराचे, आमदनीचे
घरं, दुकानं, शाळा, रस्ते उघडण्याचे, बंद होण्याचे
जाहिराती, आश्वासनं, प्रार्थना, भाकीतं
कशाचाच आधार वाटत नाही आता
राहून जात आहे मित्रांच्या गळ्यात पडणं
जिवलगांचे हात हाती घेणं
प्रियेच्या केसांत, श्वासांत, ओठांत हरवून जाणं
कधी नव्हे इतकी भीती वाटत आहे स्पर्शाची
मनात अनावर ओढ असताना
निसटून जाताहेत श्वास हळूहळू
अन् मित्रही दुखावत आहेत
एवढ्या तेवढ्या कारणावरून
अशाश्वतीच्या दिवसात
सगळं जगणंच बनू लागलंय विसंगत
आणि सुरू आहे मोजदाद
जवळचे कोण आहे टिकून घट्टपणे याची...
- श्यामसुंदर मिरजकर
अगदी खरं.. आजचं भयग्रस्त जगणं शब्दांकित करणारी कविता.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाvastav paristhiche varnanan. Kordyaa hot asalelya natyanche, manat asunhi kahi karata yet nahi yachi asahayata yatun disate. Kahitari chhan ahe
हटवाखुप छान...
उत्तर द्याहटवावास्तव आणि हृदयस्पर्शी
उत्तर द्याहटवाप्रस्तुत कवितेतून कविमनाचा हळवापणा,सद्य स्थितीची उद्विग्नता व्यक्त होते.निसटणाऱ्या मातीला निसटत चाललेल्या माणुसकीचे रूपक चपखलपणे बसते.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर वास्तवदर्शी आणि मनाला थेट भिडणार असं वर्णन. कोरोना काळात बदललेल्या समाज वास्तवाचा अत्यंत नेमक्या शब्दांमध्ये मांडलेला आलेख .
उत्तर द्याहटवावर्तमानाचे भयावह वास्तव थेटपणे टीपणारी भावव्याकुळ कविता...
उत्तर द्याहटवासध्याच्या जीवनावर नेमक्या शब्दांत वास्तववादी चित्रण केले मनाचा कोंदटपणा एकदम बाहेर पडलाय असेच लिखाण आपल्या हातून हीच सदिच्छा
उत्तर द्याहटवासद्य स्थितीला कारणीभुत असलेल्या 'कोरोना'चा उल्लेख टाळून वास्तवदर्शी परिस्थितीचा वेध घेणारी कविता. शीर्षक मात्र लक्षवेधक वाटत नाही.
उत्तर द्याहटवासूचनेचा स्वीकार
हटवासूचनेचा स्वीकार
हटवावास्तवाचा पाया पार उध्वस्त होत आहे..सारेच अशाश्वत. मृत्यू एका श्वासाच्या अंतरावर राहिल्याचा अनुभव अवघ्या काही काळापूर्वी अतिवास्तववादात अभ्यासत होतो.. आता वास्तवात अनुभवत आहोत... 'शब्दांकन उत्तम...अप्रतिम' असे पूर्वी म्हणत होतो.,, आता आपल्याच मरणाची सावली गडद होऊ लागली आहे..,,असो, तरीही लिहित, वाचत, बोलत राहू.जिवंतपणाची तेवढीच खूण.... बाकी उद्याचा भरवसा काय?
उत्तर द्याहटवाडॉ युवराज देवाळे सर धन्यवाद! या संकटातून स्वतःला सावरत पुढे जायचे आहेत परंतु ज्यांच्या अस्तित्वखुणा पुसल्या जातात त्याचे काय? हा प्रश्न सतावतोच
हटवामनातील भावना... अगदी प्रत्येकाच्या...कोण जगते, कोण मरते... समाज माध्यमेच सांगतात... भीती स्वतःच्या मरणाची नाही... आप्तांच्या, मित्रांच्या नजरेआड धगधगत्या सरणांची आहे...नको वाटते ती बातमी ऐकायला, वाचायला आणि नंतर... श्रद्धांजली वाहताना जड होतेय मन...अन समोर दिसते... डोळ्याआडचे सरण...
उत्तर द्याहटवाअस्वस्थ वर्तमान शब्दात पकडल्यानंतर कवीची अस्वस्थता कमी होते
हटवाअस्वस्थ वर्तमान मांडणारी वास्तवदर्शी कविता. हळव्या मनाची भावना हळुवार शब्दात अचूक पकडून व्यक्त केली आहेत. ही अस्वस्थताही आहे आणि असाहाय्यताही आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान कविता आहे सर. अभिनंदन.
भयावह काळात आपण सगळेच वावरतो आहोत ही जीवघेणी अस्वस्थता लेखनास प्रवृत्त करते
हटवावास्तववादी चित्रण केले आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान आहे
उत्तर द्याहटवाय
उत्तर द्याहटवाही कविता माझ्या अनेक मित्रांना send केली आमच्या व्यथा सहजपणे बोलु लागल्या आहेत..
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाधन्यवाद डॉ शौकतअली सय्यद सर! खूप अस्वस्थ करणारी व्यथा आहे ही.
उत्तर द्याहटवासद्य स्थिति चे समर्पक चित्रण , लहानपणी चे संस्कार आणि सध्य स्थिती यांचा मेळ घालताना होनारी जीवाची तगमग स्पष्ट होते
उत्तर द्याहटवावास्तवस्पर्शी काव्य सर.प्रत्येकाच्या मनात धाकधूक आहे. आपण आधी जातोय का? आपल्या जवळचे. एवढ्या जिवघेण्या संकटातही माणूस स्वार्थीपणा सोडत नाही, हे विशेष तुम्ही कवितेत मांडलं.खूप खूप छान कविता, सर.
उत्तर द्याहटवाकविता वाचताना सुद्धा अंगावर शहारे येतात खूपच छान कविता👌👌💐💐💐💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद ज्ञानेश्वर डोंगरे सर
हटवाVastav darshi swarup 👍
उत्तर द्याहटवाआजचं अस्वस्थ करणारं वर्तमान नेमक्या शब्दात आपण मांडलेले आहे. अभिनंदन सर
उत्तर द्याहटवाभयानक वास्तव दर्शन. खुपच छान.
उत्तर द्याहटवाखुपच छान. भयानक वास्तव दर्शन.
उत्तर द्याहटवा