मराठी कादंबरी सूची : संशोधकांचा वाटाड्या

मराठी कादंबरी सूची : संशोधकांचा वाटाड्या
सूची व कोश वाङ्मय यांचे साहित्य अभ्यासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण कोणतीही साहित्यकृती किंवा लेखक यांचा सुटा सुटा विचार करता येत नाही. तसा अभ्यास करताना त्या वाङ्मय प्रकाराची साहित्यपरंपरा, विविध कालखंड, त्या कालखंडात प्रभावी असणाऱ्या विचारधारा, इझम यांचाही विचार करावा लागतो. लेखक आणि त्याची साहित्यकृती हे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन पर्यावरणाचे अपत्य असते. त्यामुळेच साहित्याचा समग्रदर्शी अभ्यास महत्त्वाचा ठरतो. अशा कामात जर विविध प्रकारच्या सूची उपलब्ध असतील, तर अभ्यासकाला सोयीचे होते आणि त्याचे संशोधनाचे काम गतीने होऊ शकते. या दृष्टीने विचार करता प्रा. डॉ. विनोद राठोड यांनी साकारलेली मराठी कादंबरी सूची प्रारंभ ते २०२३ ही अत्यंत महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. जवळजवळ दहा हजार कादंबऱ्यांची नोंद या सूचीमध्ये आहे. अनेक अपरिचित लेखक व त्यांच्या विस्मरणात गेलेल्या कादंबऱ्यांची नोंद या सूचीमध्ये आढळते. त्या दृष्टीने हा सूची ग्रंथ महत्वपूर्ण आहे. विशेषतः एम. फिल., पीएच.डी.चे संशोधक, वाङ्मयेतिहास लेखक, अभ्यासक यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणारा आहे. एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य डॉ. विनोद राठोड यांनी सिद्धीस नेले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! अशाच पद्धतीने कविता, कथा, नाटक अशा विविध वाङ्मय प्रकारांची स्वतंत्र सूची तयार होणे अत्यंत गरजेचे आहे, हेही येथे नोंदवावेसे वाटते. 


मराठी कादंबरी सूची (प्रारंभ ते २०२३) 
प्रा. डॉ. विनोद राठोड 
वेदिका प्रकाशन, उदगीर, जि. लातूर 
प्रथम आवृत्ती २६ जानेवारी, २०२४
चलभाष : ९४२३२७२४०४

                        - श्यामसुंदर मिरजकर

टिप्पण्या

  1. मराठी कादंबरी सूची ग्रंथाचे खूप छान विश्लेषण केले आहे.आणि त्याची उपयुक्तता स्पष्ट केली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)