पोस्ट्स

पुस्तक परीक्षण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पावळण : स्त्रीत्वाचे दाहक अनुभवविश्व घेऊन येणारी कविता

इमेज
पावळण : स्त्रीत्वाचे दाहक जीवनानुभव         मराठी कवितेत आपल्या सातत्यपूर्ण लेखनाने कवयित्री रामकली पावसकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हंबर (१९८५), ओले अथांग श्वास (२००८), सांजसावल्या (२०१५) या तीन काव्यसंग्रहा नंतर पावळण (२०१९) हा डिंपल प्रकाशनाकडून आलेला संग्रह आहे. यामध्ये एकूण ५२ कविता आहेत. आत्मस्वर लाभलेली कवयित्री कधी स्वतःचा, तर कधी स्वतःभोवती विविध नातेसंबंधात असणाऱ्या माणसांचा शोध घेते. या कविता म्हणजे व्यक्ती-समष्टीचा संवाद आहे. संग्रहाच्या पूर्वार्धात स्वतःचे अनुभवविश्व कवयित्री मांडत जाते.             तू डोळे मिटून असतोस             तेव्हा पापण्याआड तुला             मीच दिसते की             घनघोर अंधार...!             तुझा नि:स्तब्ध चेहरा ...

ग्रामीण मुलांचे भावविश्व चित्रित करणारी कविता : थुईथुई आभाळ

इमेज
ग्रामीण मुलांचे भावविश्व चित्रित करणारी कविता : थुईथुई आभाळ        लहान मुलांचे भावविश्व हे अद्भुतरम्यतेने भरलेलं असतं. एका अनोख्या कल्पनेच्या विश्वात ते वावरतात. आपल्या सभोवताली दिसणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विसंगती त्यांना जाणवतात आणि ते निखळ हसत राहतात. त्यांच्या मनोभूमीत निर्माण होणाऱ्या कल्पना इतक्या विलक्षण वेगळ्या असतात की त्या ऐकून आपणही थक्क होतो. त्यांचं कार्टून प्रेम हा त्याचा पुरावा आहे. बालसाहित्य लिहिणाऱ्या लेखक-कवींना याचे नेमके भान असावे लागते.        कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या कवी गोविंद पाटील यांना हे बालमानस अचूक सापडले आहे. गेली अनेक वर्षे उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी या परिसरात अनेक कार्यक्रम राबविले आहेत. रमिजा जमादार सारख्या अनेक बाल साहित्यिकांना घडविले आहे. 'गावकीर्तन', 'उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता', 'धूळधाण' हे त्यांचे काव्यसंग्रह अगोदरच प्रकाशित आहेत. अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. 'थुई थुई आभाळ' हा गोविंद पाटील यांचा पहिलाच बालकवितासंग्...

'मृत्यू सुंदर आहे!' आत्मभान देणारे नवे पुस्तक...

      जीवनाचे व्यापक आत्मभान देणारे पुस्तक: मृत्यू सुंदर आहे!        मानवी जीवनातील अटळ वास्तव म्हणजे मृत्यू! हा शब्द कानी पडला तरी अनेकांचा थरकाप उडतो. लोक प्राणभयाने व्याकूळ होतात. जवळच्या आप्तस्वकीयांचे मृत्यू माणसाला दुःखाच्या सागरात लोटतात. स्वतःच्या मृत्यूची कल्पना किती भयावह असेल!  मृत्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाची समाप्ती, अशी एक सरधोपट जाणीव प्रत्येकाजवळ असते. त्यामुळेच अनेक धर्मातील पुरोहित मध्यस्थांनी मृत्यू कल्पनेला केंद्रस्थानी ठेवून अनेक कथा, कर्मकांड रचले. मृत्यूनंतरच्या जगाची एक कल्पना मांडली. सामान्य माणसांना अगतिक बनवले. त्यांना सुंदर सरळमार्गी जगण्यापासून वंचित केले. कोट्यवधी माणसांच्या जीवनातील जगण्याचा आनंद हिरावून घेतला.        परंतु मृत्यू ही नैसर्गिक आणि सुंदर गोष्ट आहे, हे सांगणारे एक तत्त्वज्ञान भारतात आहे. त्याचा परिचय फार थोड्यांना होता. मराठीत प्रथमच डॉ.रवींद्र श्रावस्ती यांनी प्रदीर्घ आणि साधार लेखन करून हा विषय चर्चेत आणला आहे. 'मृत्यू सुंदर आहे!' या लोकायत प्रकाशनाने प्रकाशि...