भावमुद्रा (कविता)
🦋🦋🦋
मी टिपल्या माझ्याच असंख्य भावमुद्रा
जतन केल्या मोबाईल मधल्या गॅलरीत
उत्साहाने दाखविल्या इतरांना
अन्
स्वतःच पुनःपुन्हा पाहून खूश झाले
मी जपू पाहते एक अल्लड मुलगी
मला हसायचं आहे
टिकवायचाय उत्साह निरंतर
नको असणारी अनेक 'चित्रं' आजूबाजूला
मी डिलीट करते अनावश्यक बॅकग्राऊंड
मी मलाच पाहते -दाखवते- जपते
वाऱ्याशी खेळणाऱ्या केसांची सैलसर बांधणी
ओठातून डोकावणारी शुभ्र दंतपंक्ती
एक आपुलकीचं हसू
मुठीवर रेललेली कलती मान
स्वतःचा शोध घेणारे डोळे...
कृपया
असं समजू नका
हलकासा मेक-अप करून
खोटं खोटं हसणारी एक फोटोजेनिक मॉडेल
खरे तर
अजूनही खूप चित्रं आहेत माझीच
असंख्य मूड मधली
घरकामातली,
राबणारी
चिंता वैताग टेन्शन आणि इतरही काहीबाही
त्याचंही एक सौंदर्य आहेच
जाणत्या समंजस डोळ्यांशिवाय ती कशी रुचतील?
मग कशाला त्याचे प्रदर्शन?
मी खूप काही आहे
या डीपीच्या चित्राच्या पलीकडे...
मला इतकंच कळतं
माझ्या अस्तित्वाचा दरवळ असतोच इथेतिथे
असतात तरंग हर्ष-खेदाचे
जे फोटोत पकडता येत नाहीत
ते सगळं जपणारं
आत्मीय संवेदन आहे तुमच्याजवळ...?
- श्यामसुंदर मिरजकर
सर ,
उत्तर द्याहटवासुंदर कविता ....
सर, छानच
हटवाNice
उत्तर द्याहटवाअप्रतिम सर
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवासर अतिशय सुंदर मांडणी..👍👍
उत्तर द्याहटवाखरं आहे.. छान अभिव्यक्ती
उत्तर द्याहटवाBestch
उत्तर द्याहटवाखूप सुंदर कविता
उत्तर द्याहटवाNice👌👌
उत्तर द्याहटवामी खूप काही आहे. डीपीच्या चित्राच्या पलीकडे...
उत्तर द्याहटवाअसंख्य भावनांना व्यक्त करणाऱ्या ओळी...
खरंय
हटवाधन्यवाद 🙏
खूपच सुंदर कविता....!
उत्तर द्याहटवाडीपीतील भावमुद्रेइतकीच ताजी आणि सुंदर.
पुर्वी वाचली होती. आज वाचताना तीतकीच ताजी वाटली.
धन्यवाद गायकवाड सर🤝
हटवामाझ्यातल्या मी ला शोधणारे स्त्री मन वाचताना सहजच अर्धांगीनी नजरेसमोर येते.....
उत्तर द्याहटवासुंदर मांडणी आहे सर...छान
विनोद कांबळे धन्यवाद 👏
हटवाआपण स्वतःलाही ओळखून घेऊ शकत नाही. दुसऱ्याची तर बात सोडला. फोटोच्या पलीकडे उत्तम चिंतन
उत्तर द्याहटवाउत्तम कविता !!
उत्तर द्याहटवाही कविता नवं काहीतरी सांगत आहे !!
अभिनंदन !!
अप्रतिम सर
उत्तर द्याहटवाNice a अचूक शब्दांची पकड सर
उत्तर द्याहटवासद्यपरिस्थितीला अनुरूप असणारी ही कविता
उत्तर द्याहटवास्वतःच्या भावना फोटोंमधून प्रतिबिंबित करणारी ही ललना किंबहुना काही अदृश्य भावना की ज्या चित्रामध्ये बांधलेल्या पण जाणकार व्यक्तीशिवाय न दिसणाऱ्या 'त्या'भावभावनांचे तरल वर्णन आणि शब्द रेखाटन प्रस्तुत कवितेत आपण अगदी लिलया केले आहे.
धन्यवाद 😊
हटवाअचूक रचना, मनीचा भाव छान जुळले आहे
उत्तर द्याहटवासहज, सुंदर, अप्रतिम , लाजवाब, रसरशीत......…...!!!!!!!
उत्तर द्याहटवाएक वेगळा विषय आणि आत्मचिंतन सादर करणारी कविता मनाला खूपच भावली,धन्यवाद
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवामला तरी छानच वाटली
उत्तर द्याहटवायाशिवाय मला जास्त समजत नाही
सुंदर कविता
उत्तर द्याहटवाखोलवर विचार करायला लावणारी कविता आहे.
उत्तर द्याहटवासुंदर कविता आहे.खरोखरच तीच्या मनातील भाव उमटले आहेत.
उत्तर द्याहटवाधन्यवाद वैशाली मॅडम
उत्तर द्याहटवा