एक सेल्फी मित्रासोबत (कविता)
एक सेल्फी मित्रासोबत
वाट्याचं चतकोर आयुष्य
मुठीत घट्ट पकडून चालते
तेव्हाही
गरज असते सोबतीची
मी झाडांशी बोलते
पाखरांशी गाते
कोकरांच्या कानात गुपित सांगते
मला आवडतात रंग
हिरवे पिवळे गुलाबी
निळे सावळे मोरपंखी
आवडतात
रंगात रंगणारी माणसंही
एक लालबुंद ठिपका
कधीकाळी गोंदवलाय कपाळावर
नकळत्या वयात.....कौतुकाने
आता तो विस्तारत पसरलाय सर्वत्र
सीमारेषा बनून
सीतेच्या अग्निदिव्यात अन्
सती सावित्रीच्या त्यागात
मला दिसताहेत अलवानी छटा
हिरवे पिवळे मनभावन रंग पार हद्दपार
फार फार वर्षांपूर्वी
आटपाट नगराच्या काळापासून
त्यांनी बसवलेत सीसीटीव्ही कॅमेरे सर्वत्र
मला परिघाबाहेर पाय टाकता येत नाही
तरीही
एक नटखट फुलपाखरू
रुंजी घालतंय सभोवती
बसतंय हळूच मधुवंती खांद्यावर
या माझ्या मित्रासोबत
पंखाशी थोडं रेलून
काढायचाय सेल्फी कधीपासून
पण...
व्हायरल होण्याच्या भीतीने
बटन क्लिक होत नाही अजून...
- श्यामसुंदर मिरजकर
फार छान...खरी
उत्तर द्याहटवाखूप सुंदर कविता.
उत्तर द्याहटवाछान जमलेय.
उत्तर द्याहटवाव्वा! क्या बात है! 🌷🌱🌹
उत्तर द्याहटवानटखट फुलपाखरू
मधुवंती खांदा!
व्वा!
स्त्रियांची घुसमट नेमकेपणाने मांडली...धन्यवाद
उत्तर द्याहटवासर कवितेतून समाज जीवनावर भाष्य करताना सर्वच काळातील जीवन मांडले खूप मार्मीकपणे समाज आजही एकञ नाही,जात, धर्म यातच गूरफटला आहे.हेच खरे .खूप छान.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर कविता.
उत्तर द्याहटवाकविता खूप सूचक आहे.
उत्तर द्याहटवापरीघ छेदू पाहणार्या स्त्रीची घुसमट व्यक्त करते आहे.
वाच्यार्थ= कवयित्री आपल्या मनातील भाव प्रकट करताना म्हणते की कधी कधी आपल्या सुहृदांसोबत व्यक्त व्हावं स्वछन्द बागडाव आपल्या मनातील पीडा भावना त्यांसोबत व्यक्त व्हाव्या पण कुंकवाची मर्यादा,समाजाची नजर,यामुळे तिला तस व्यक्त होत येत नाही आणि जर तस करण्याचा प्रयत्न केलाच तर शंका कुशंकांची अग्निपरीक्षा ठरलेलीच आहे.शेवटी कवयित्री म्हणते की मला आपल्या सख्या सुहृदासोबत एक तरी स्वयंप्रतिमा काढायची आहे की ज्यामुळे ती त्या आठवणींच्या आधाराने समाधानी होईल.
उत्तर द्याहटवाव्यंगार्थ= सामाजिक नियम,कुटुंबपद्धती ,चाकोरीबद्ध अलिखित आचारसंहिता ह्या जणू पुरुष कमी स्त्रियांनाच जास्त आखलेल्या आहेत कदाचित स्त्री अबला यामुळेच झाली .तिला फारस व्यक्तिस्वातंत्र्य नाही काळ बदलला तरी काही प्रमाणात अजूनही मानसिकता तशीच आहे याची खंत कवयित्रीला अजूनही वाटते.जरी बंडखोरी करून अस करण्याचा प्रयत्न केला तर तिला अजूनही कुटुंब ,समाज यांच्या शंकारूपी अग्निपरिक्षेला सामोरे जावे लागेल.कदाचित ती स्वाभिमानाने देईलही जिंकेलही परंतु तरीही तिला ते नकोय कारण तिला कुंकवाची मर्यादा सांभाळायची आहे आणि प्रेमापोटी ती हेही करायला तयार होते.सतत त्याग करायला शिकलेली ही स्त्रीत्वता मर्यादेने याही ठिकाणी माघार घेते कारण अग्निपरीक्षा जणू स्त्रीच्याच गाठी मारलेली आहे.कधीतरी मला माझी मी सापडेन का?मला माझ्या सुहृदांसोबत स्वयंप्रतिमा (स्वतःची ओळख) घेता येईल का असा प्रश्न ती विचारत आहे.खरंच तिची ही व्हायरल ओळख समाजाला मान्य होईल का? ...
खूप सविस्तर आणि चांगला प्रतिसाद दिला आहे. कोणी लिहिला आहे बरं हा? कृपया कळवावे. मनःपूर्वक 🙏
हटवाSir,striyanchya jivanatil ek satya ya kavitetun tumhi mandla aahat,khupch chan
उत्तर द्याहटवाKavita Vinod kamble
खूप छान सर, समाजात वावरताना स्त्रीलाही एका चांगल्या मित्राची गरज असते हे एक स्त्री असूनही आम्ही स्त्रिया मान्य करायला तयार नाही. प्रत्येक वेळी पुरुषांतील पुरोगामीत्व स्त्रीची बाजू मांडते.
उत्तर द्याहटवात्या पातळीवर जाऊन विचार केला तर त्याचं महत्त्व पटतं
हटवाआज ही 21व्या युगात हे वास्तव असता पुसता येत नाही
उत्तर द्याहटवामनातील असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मांडता येत नाहीत
फक्त
घुसमटलेल्या, भेदरलेल्या मनात जीव मुठीत घेऊन आपले अस्तित्व शोधावे लागते
माझ्याच माणसांची मलाच कधी कधी इतकी भीती वाटते
की ओठावर आलेले शब्द पोटातच घर करतात
नुसती सुशिक्षितपणाची झालर अंगावर पांघरूण
येणारे दिवस रेटावे लागतात
सर,
तुम्ही मांडलेले मत मला तर रोज माझ्या अवतीभोवती दिसते
आपण तर वस्तुस्थितीच मांडली धन्यवाद
हटवाकोणाचा अभिप्राय आहे हा? नाव कळेल काय?
हटवासुरुवातीपासून शेवटपर्यंत अप्रतिम शब्द कळा !
उत्तर द्याहटवाचतकोर आयुष्यालाही व्यापून राहिलेला लालबुंद ठिपका ,मनभावन रंगांच्या अलवानि छटा ,मनाला भिडलेलं ,रुंजी घालणारे नटखट फुलपाखरू ,मधुवंती खांद्याला होणारा त्याचा अलवार स्पर्श ,हे सारे खरे खुरे व्यक्त करायची इच्छा असताना तो लालबुंद ठिपका सार्या सार्या भावनांना बंदिस्त करत राहिलाय .खूप खूप अलवार कविता !
खूप चांगली प्रतिक्रिया. नेमकेपणा. कवीला बळ देते अशी प्रतिक्रिया. कोणी लिहिले आहे?
हटवाकविता विचारप्रवर्तक आहे . विविध अर्थछटा आहेत . कविता आवडली .
उत्तर द्याहटवाधन्यवाद दुकळे सर
हटवापुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रीचं वास्तव मनोगत मांडलंय.बंधनयुक्त आयुष्य जगण सोपे नव्हे. छान कविता सर.
उत्तर द्याहटवाचंद्रकांत निकमसर. म्हासुर्णे.
स्त्रीयांच्या अव्यक्त व बंदिस्त परिघाला मुक्त होण्यास मोकळी करुन दिलेली वाट खूपच छान सर
उत्तर द्याहटवाप्रकाश शिंदे सर मोराळे