आप की आँखों में कुछ...
आप की आँखों में कुछ...
प्रेम ही सौंदर्यात्मक भावना आहे. हे सौंदर्य असते मनाचे, आदरयुक्त आत्मीयतेचे. ते व्यक्त होताना मात्र शारीर संकेतांच्या स्वरूपात दिसू लागते. उत्फुल्ल स्वरूपात प्रकटते. अंतरंगात कमलिनी सारखे उमलणारे प्रेम नजरेतून स्रवते. हसण्यातून दरवळते. लयबद्ध हालचालीतून ओसंडते. या प्रेमभावनेचे वर्णन करताना अनेक कवी देहसौंदर्याचे वर्णन करतात. परंतु त्या सुंदर दिसणाऱ्या देहामध्ये तितकेच सुंदर मन आहे, हे विसरतात. कवी गुलज़ारजींनी मात्र एका गाण्यात बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्याचेही वर्णन केले आहे.
पाणीदार, गहनगहिरे डोळे हे सौंदर्यही आहे आणि भावनांची आरासही! डोळे खूप काही सांगून जातात, फक्त ते वाचता आले पाहिजे. अपेक्षा अशी असते की आपल्या प्रियवराने न सांगताही आपल्या भावना समजून घ्याव्यात. त्या भावभावना जाणून घेण्याचा एकमेव मार्ग असतो डोळे! ज्याला ही डोळ्यांची भाषा कळते त्याला मनातील हर्षखेदही कळतात. त्यातूनच सहजीवनाची रंगत वाढत जाते. म्हणूनच 'घर' चित्रपटातील पती (विनोद मेहरा) पत्नी(रेखा)चे गुणगान करताना आदरपूर्वक म्हणतो,
आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है
आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ है
'तुमच्या डोळ्यांत काही बहरलेली गुपिते आहेत. तुमच्यापेक्षा तुमच्या नानाविध हरकती, अदा अधिक सुंदर आहेत.' इथे तो समोर असल्यामुळे तिच्या डोळ्यांमध्ये काही गुपिते बहरून आली आहेत. ती खास त्याच्यासाठीच आहेत. त्यानेच वाचावीत अशी अपेक्षाही असेल! म्हणूनच ती आज अंगप्रत्यंगातून बहरून आली आहे. ते नेमकेपणाने जाणून त्याने असे म्हणणे म्हणजे अनवट देहलिपीचा उलगडा होण्यासारखे आहे. असा नेमकी दाद देणारा रसिक सहचर मिळणे हे परमभाग्य!
लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं
आप की आँखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं
आप की खामोशियाँ भी आप की आवाज़ हैं
अशावेळी बोलू की नको या संभ्रमात असणारे तिचे ओठ फक्त किंचितसे हलले तरी मोगऱ्याची सुगंधी फुले फुलण्याचा आभास त्याला होतो. तिच्या गहन गहिऱ्या डोळ्यांमध्ये कधी किनारा भेटू शकेल का, असा प्रश्न त्याला पडतो. कारण एकदा का डोळ्यांच्या गहराईत उतरले की किनारा लाभणे कठीण! त्याचवेळी हेही जाणवते की तिचे मौन हाही तिच्या अभिव्यक्तीचा सुंदर स्वर आहे. तो तन्मयतेने जाणून घेतला पाहिजे. हाच शब्देविण संवादु!
आप की बातों में फिर कोई शरारत तो नहीं
बेवजह तारिफ़ करना आप की आदत तो नहीं
आप की बदमाशियों के ये नये अंदाज़ हैं
स्वतःचे कौतुक कोणाला आवडत नाही? पण तरीही समोरची व्यक्ती थेट कौतुक करते तेव्हा मनात शंका डोकावते, ही थट्टा तर नव्हे! परंतु विनाकारण कौतुक करण्याचा समोरच्याचा स्वभाव नाही, हेही लक्षात येते. मग वाटते ही खोडकर प्रेमानुभूतीच आहे, की जी पुन्हा पुन्हा अनुभवावी.
नातेसंबंधात अतिशयोक्तीने केलेला गौरव हा खोटा वाटत राहतो. त्याचप्रमाणे कौतुकाचे चार शब्दही कानावर न पडणे हे त्रासदायक वाटत राहते. कौतुकाच्या बोलांनी प्रेम खुलते, तर दुर्लक्ष केल्यामुळे ते कोमेजते. खरे तर प्रेमात दोघांचे नटणे-सजणे, सौंदर्य फुलविणे, हे परस्परांची दाद घेण्यासाठीच असते. तेव्हा रसिकपणाने दिलखुलास उद्गार बाहेर यायला हरकत नसते. पण काही लोक कंजुषी करतात, तर काही अतिशयोक्ती! या दोन्ही गोष्टींचा उबग येतो. कंटाळा येतो. जे आहे ते आणि तेवढेच व्यक्त व्हावे. ना कमी ना जास्ती, असे वाटत राहते. सौंदर्य देहाचे आहे, तसेच ते मनाचे, विचारांचे, कला कौशल्यांचेही आहे. या सगळ्या गोष्टी कळत नकळत आपल्या प्रिय व्यक्तीसमोर सादर केल्या जातात. त्याची नेमकी नोंद घेणे आणि योग्य वेळी योग्य शब्दांत दाद देणे, हेच प्रेमातील श्रेयस आहे.
गुलज़ारजींनी नेहमीप्रमाणे अर्थघन प्रतिमांचा वापर करत प्रेमभाव शब्दांत पकडला आहे. किशोर आणि लताजींचा अप्रतिम स्वरमेळ गाण्याला एक खोली बहाल करतो. अर्थांची अनेक वलये मनात उमटतात. आर. डी. बर्मन यांचे संगीत प्रेमभावनेचे लडिवाळ आणि खोडकर रूप टिपण्यात नेहमी प्रमाणेच यशस्वी ठरते. एका अद्भुत गीताची निर्मिती होते. अनेक पिढ्यांना मोहिनी घालणारे चिरतरुण गाणे रेखाच्या बोलक्या डोळ्यातून आणि विनोद मेहराच्या खोडकर हसण्यातून आपल्यापर्यंत पोहोचते.
*गाणे ऐकण्यासाठी खालील लिंक कॉपी करा*
गुलजारजींच्या काव्य सौंदर्याइतकेच तुमच्या लेखणातील शाब्दिक सौंदर्याने मनाला भुरळ घातली...
उत्तर द्याहटवाखूप छान सर...... 😊👍🏻
व्वा.. अप्रतीम गाणी.. फार आवडती..
उत्तर द्याहटवागुलज़ारजींनी नेहमीप्रमाणे अर्थघन प्रतिमांचा वापर करत प्रेमभाव शब्दांत पकडला आहे ✅👌
उत्तर द्याहटवाWaah waa, खूप छान 🙂👍🏼👌🏼👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाहे सुंदर गाणे माझे आवडते आहे. गाणे ऐकल्यानंतर ते सतत ऐकावे व गुणगुणत रहावे असेच हे अविस्मरणीय व सुरेख गीत आहे. श्याम, तू या गाण्याचा भावार्थ खूप खूप सुंदर व अप्रतिम लिहिला आहेस.
उत्तर द्याहटवाधन्यवाद.🙏🙏
आवडते गाणे
उत्तर द्याहटवापुस्तक छान होईल.
उत्तर द्याहटवागुलजार यांचा अभिप्राय, ब्लर्ब घेता आल्यास पाहा.
उत्तम विवेचन
उत्तर द्याहटवाखूप चांगल्या पद्धतीने आपण लिहिले आहे. मनाला भावते, भुरळ घालते आणि वाचावेसे वाटते. अत्यंत वाचनीय झाले आहे. अजून काही अशाच गीतांचे रसग्रहण करा व पुस्तक रूपाने बाहेर येऊ द्या. मनःपूर्वक स्वागत करू....!! 💐👍🏻💐👍🏻💐
उत्तर द्याहटवाएकदम सुंदर...
उत्तर द्याहटवानवी कल्पना आहे ...
पुस्तक लवकर करा...
मनःपूर्वक शुभेच्छा 🎉
Ya ganyatil sarva shabdancha pura pura arth sarva shresht padhatine mandla aahes yabaddal bharpur kautuk .
उत्तर द्याहटवाBharpurAbhinandan......
Vivekanand Pise
उत्तर द्याहटवाSilvassa.
Ya ganyatil sarva shabdancha pura pura arth sarva shresht padhatine mandla aahes yabaddal bharpur kautuk .
Shamsundar
Majhya bhava
Tujhe
BharpurAbhinandan......
गहनगहिरे डोळे हे सौंदर्यही आहे आणि भावनांची आरासही आहे.... सुंदर अभिव्यक्ती
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा🧤🧤🧤💐👌 श्याम सरजी, खूप मस्त , खूप आवडलं कारण आम्हा कलाकरांना एक ऊर्जा मिळते , त्याचबरोबर कल्पनाशक्ती वाढते . एकदंरीत अनुभूती हा शब्द कळतो .
उत्तर द्याहटवासुंदर !! ही गाणी आपल्या सगळ्यांचे सांस्कृतिक संचित आहे .आपण केलेले रसग्रहण म्हणजे त्या भावनांचा लालित्यमय प्रवास आहे.निवडक रसग्रहणाचे पुस्तकही होईल.दृशकलांमध्ये गाण्यांची सांस्कृतिक भूमिका असे काही करता येईल.
उत्तर द्याहटवाधन्यवाद दा. गो. काळे सर! आपण म्हणता तसे पुस्तक करता येईल.
हटवागुलजार या प्रतिभासंपन्न कवीच्या आनंद,आँधी,किनारा,खामोशी आणि खूशबू या चित्रपटातील गीतानंतर आपण 'घर'या चित्रपटातील "आप की आँखोंमे कुछ" या गीतातील आल्हाददायक प्रेमभाव,उत्कंठा यामुळे शरीराला मोरपिसाचा अलगद स्पर्श व्हावा आणि सर्व चित्तवृत्त बहरुनी जाव्यात व अंगभर शहारे निर्माण व्हावेत असा अनोखा अनुभव प्रत्ययास येतो.ही किमया आपल्या प्रतिभेची साक्ष देणारी आहे.धन्यवाद आणि अभिनंदन!
उत्तर द्याहटवाखूप सुंदर गीत शब्द आणि सुर👌👌
उत्तर द्याहटवाएका अप्रतिम गाण्यावर तेवढाच अप्रतिम असा लेख आपण लिहिला आहे. खूपच छान.
उत्तर द्याहटवाYeah Geet Auort ki khubsurti ki misal hi
उत्तर द्याहटवा