आभाळधून (कविता)
आभाळधून
शुभ्र जराशा कोमल प्रहरी
उंच उडाले आभाळपक्षी
दर्शनमात्रे घन ओथंबून
काळजात अन् सुरेल नक्षी.
पहाटवारा फुलाफुलांतून
पेरीत गेला जाग जराशी
कुठे न विझली, शाबूत आहे
त्वचेखालती आग अधाशी.
अनघड वाटा साद अनामिक
जीव धपापे स्पंदित गंधित
स्पर्शांमधल्या जादूने अन्
शब्द थरारे, मन रोमांचित!
- श्यामसुंदर मिरजकर
खूपच सुंदर कविता आहे..
उत्तर द्याहटवासर खुप छान कविता आहे
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर शब्द रचना,लय,ताल
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाफारच छान.. आवडली कविता.
उत्तर द्याहटवाएक सुचवते- आभाळपक्षी आणि शाबूत मधे एक मात्रा जास्त होते. त्यामुळे लय बिघडते. तिथे बदल करावा.
हो. नक्की
हटवासुंदर
उत्तर द्याहटवाखूपच छान.माझ्या मनाला भावली.
उत्तर द्याहटवामनमोहक 😇👍
उत्तर द्याहटवानिसर्गाशी भावनांची एकरूपता व वातावरण निर्मिती,शब्दांची मोहकता...,. केवळ अप्रतिम
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी
हटवाअतिशय मोजक्या शब्दात बरंच काही अभिव्यक्त करण्याची अचाट प्रतिभा आपल्यात आहे सर...
उत्तर द्याहटवासर, छान रचना केली आहे
उत्तर द्याहटवासुंदर, अप्रतिम रचना... क्षणभर कुसुमाग्रजांची कविता वाचतोय असा भास झाला...
उत्तर द्याहटवाकुसुमाग्रज हे प्रतिभावंत होतेच। त्यांची आठवण होणे हे कवितेचे यश!
हटवाअप्रतिम सर .............
उत्तर द्याहटवाकल्पनेचा सुंदर पिसारा फुलवून केलेली रचना मनावर मोरपीस फिरल्याचा आनंद देते.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवामनःपूर्वक धन्यवाद
उत्तर द्याहटवाछानच
उत्तर द्याहटवा