पोस्ट्स

पावळण : स्त्रीत्वाचे दाहक अनुभवविश्व घेऊन येणारी कविता

इमेज
पावळण : स्त्रीत्वाचे दाहक जीवनानुभव         मराठी कवितेत आपल्या सातत्यपूर्ण लेखनाने कवयित्री रामकली पावसकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हंबर (१९८५), ओले अथांग श्वास (२००८), सांजसावल्या (२०१५) या तीन काव्यसंग्रहा नंतर पावळण (२०१९) हा डिंपल प्रकाशनाकडून आलेला संग्रह आहे. यामध्ये एकूण ५२ कविता आहेत. आत्मस्वर लाभलेली कवयित्री कधी स्वतःचा, तर कधी स्वतःभोवती विविध नातेसंबंधात असणाऱ्या माणसांचा शोध घेते. या कविता म्हणजे व्यक्ती-समष्टीचा संवाद आहे. संग्रहाच्या पूर्वार्धात स्वतःचे अनुभवविश्व कवयित्री मांडत जाते.             तू डोळे मिटून असतोस             तेव्हा पापण्याआड तुला             मीच दिसते की             घनघोर अंधार...!             तुझा नि:स्तब्ध चेहरा ...

ग्रामीण मुलांचे भावविश्व चित्रित करणारी कविता : थुईथुई आभाळ

इमेज
ग्रामीण मुलांचे भावविश्व चित्रित करणारी कविता : थुईथुई आभाळ        लहान मुलांचे भावविश्व हे अद्भुतरम्यतेने भरलेलं असतं. एका अनोख्या कल्पनेच्या विश्वात ते वावरतात. आपल्या सभोवताली दिसणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विसंगती त्यांना जाणवतात आणि ते निखळ हसत राहतात. त्यांच्या मनोभूमीत निर्माण होणाऱ्या कल्पना इतक्या विलक्षण वेगळ्या असतात की त्या ऐकून आपणही थक्क होतो. त्यांचं कार्टून प्रेम हा त्याचा पुरावा आहे. बालसाहित्य लिहिणाऱ्या लेखक-कवींना याचे नेमके भान असावे लागते.        कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या कवी गोविंद पाटील यांना हे बालमानस अचूक सापडले आहे. गेली अनेक वर्षे उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी या परिसरात अनेक कार्यक्रम राबविले आहेत. रमिजा जमादार सारख्या अनेक बाल साहित्यिकांना घडविले आहे. 'गावकीर्तन', 'उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता', 'धूळधाण' हे त्यांचे काव्यसंग्रह अगोदरच प्रकाशित आहेत. अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. 'थुई थुई आभाळ' हा गोविंद पाटील यांचा पहिलाच बालकवितासंग्...

पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ : नागनाथअण्णा नायकवडी

इमेज
        पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ : नागनाथअण्णा          भारतीयांच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ इंग्रज घालवणे आणि त्याठिकाणी एतद्देशीयांना बसविणे इतका मर्यादित कधीच नव्हता. तर हा देश इथल्या  कष्टकरी- श्रमजीवी-दलित-वंचित स्त्रीशूद्राच्या कल्याणाचा काळजीवाहक व्हावा, अशी प्रखर जाणीव इतिहासातील काही लढवय्या नायकांना होती. त्यांपैकी एक म्हणजे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी होय. बालपणापासून ज्यांचे नाव आम्ही भाषणांमधून ऐकायचो किंवा वृत्तपत्रात वाचायचो त्यांना जवळून अनुभवण्याचा योग वाळवा येथे २० ते २२ जानेवारी, १९९६ रोजी झालेल्या चौथ्या दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनात आला. महाराष्ट्रातील कर्ते कार्यकर्ते आणि डावे विद्रोही आंबेडकरवादी विचारवंत एका मंचावर येण्याचा हा प्रसंग होता. अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण होते ते. त्यावेळी मी रुकडी येथे प्राध्यापक होतो. आम्ही आवर्जून वाळव्यात आलो. जबरदस्त उत्साहात चाललेली ती वैचारिक घुसळण पाहिली. अनेक लेखक विचारवंतांना प्रथमच पाहिले. ऐकले. भरभरून चर्चा केली. पुस्तकांची खरेद...

झाड वाचूया आनंदे (ललित लेख)

इमेज
झाड वाचूया आनंदे        "परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः।" असा एका संस्कृत श्लोकाचा पूर्वार्ध आहे. 'अामूलाग्र परोपकार' असं आपण वृक्षांचं वर्णन करू शकतो. पशु, पक्षी, मानव सर्वांना वृक्ष काहीतरी देतच असतात. जे वृक्षांना पाणी घालतात, त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून झटतात, त्यांनाही वृक्ष फलपुष्पपत्रछाया देतात आणि जे वृक्षतोड करावयास येतात त्यांनाही वृक्ष फलपुष्पपत्रछाया या सगळ्या गोष्टी देतात. म्हणूनच संत ज्ञानदेवांनी वृक्षांना सत्पुरुष म्हटले आहे. परंतु या परोपरकारी मित्रांना आपण किती समजून घेतो? त्यांचे मोठेपण किती जाणतो? कवी वसंत आबाजी डहाके यांची एक विलक्षण वेगळी कविता आहे.         झाड तोडायचे, कापायचे         लगदा करायचा, कागद बनवायचा         त्यावर लिहायचे, ते छापायचे         एवढा खटाटोप कशासाठी?         सरळ झाडच वाचावे! खरे तर साहित्य हे जीवन समजून घेण्यासाठी अ...

गवंडी मायाप्पा गायकवाड आणि डॉ. बाबासाहेबांची पुस्तकं

इमेज
गवंडी मायाप्पा गायकवाड आणि डॉ. बाबासाहेबांची पुस्तकं       सामान्य कष्टकरी माणूस बहुधा आतबाहेर सर्वत्र प्रांजळ प्रामाणिक असतो. हे कष्टकरी निरक्षर असतात किंवा अल्पशिक्षित असतात. तरीही जगण्याची लढाई लढताना त्यांच्यामध्ये आशावाद ठासून भरलेला असतो आणि कोणता आदर्श नजरेसमोर ठेवायचा याचे एक जागते भान देखील त्यांच्याकडे असते. जत विजापूरकडून रोजगारासाठी सांगलीत आलेल्या मायाप्पा गायकवाड या कन्नड बांधकाम मजुराशी माझा संबंध येण्याचे तसे काही कारण नव्हते. धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस होता. सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मी पुस्तकांचा स्टॉल मांडला होता. दुपारी दोन अडीच पर्यंत विक्री केली आणि पुस्तके गोळा करून स्टॉल आवरू लागलो. त्याच वेळी एक उन्हाने रापलेला काळासावळा माणूस स्टॉल जवळ उभा राहिला. अंगात टेरिकॉटचा शर्ट, पांढरी विजार आणि अगदी जुनी कामचलाऊ सायकल. बघता क्षणीच खेडवळ वाटावा असा.          त्याने विचारले, "काय हाय वो अण्णा? पुस्तकं हाईत व्हय."         मी पुस्तके लावता लावता म्हणालो, "होय."    ...

सणकांडी मुक्ताई

इमेज
 * सणकांडी मुक्ताई *       इ. स. १२९०-९१ च्या दरम्यानची गोष्ट. पंढरपुरात नामदेव नावाचा एक २० वर्षांचा तरुण हरिभक्त अभंग लेखन, भजन-कीर्तन या माध्यमातून ख्यातकीर्त झाला होता. समविचारी लोकांचा मेळा जमवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. श्रीविठ्ठलाची भक्ती आणि आषाढी कार्तिकी वारी यामुळे पंढरपूर एक जागते तीर्थक्षेत्र बनले होते. याच दरम्यान पंढरपुरात आळंदी-पैठण इकडून येणाऱ्या भक्त मंडळींकडून एक वार्ता पोहोचली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई नावाच्या चार भावंडांना ब्राह्मणांनी वाळीत टाकले आहे. परंतु ही नाथपंथी भावंडे बुद्धिमान आहेत. वेदशास्त्र, उपनिषद, पुराणांचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी पैठणच्या ब्रह्मवृंदांशी शुद्धिपत्र मिळविण्यासाठी वाद घातला आहे. तेथील ब्राह्मण थक्क झाले आहेत. परंतु या भावंडांना शुद्धिपत्र मिळालेले नाही. त्यांनी वेदान्तावर व्याख्यान दिले. पुराण सांगितले. इतकेच नव्हे तर कव्ययज्ञात अस्खलितपणे मंत्रोच्चाराने पितरांना आवाहन केले. त्यांच्या अलौकिक वाणीने, प्रतिभेने जन वेडावले आहेत. पुढे त्या भावंडातील ज्ञानदेवाने गीतेव...

सत्यशोधकीय नियतकालिके

इमेज
सत्यशोधकीय नियतकालिके - वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ डॉ. श्यामसुंदर मिरजकर All things must be examined, debated, investigated without exception and without regard for anyone's feelings. - Denis Diderot       फ्रेंच तत्त्वज्ञ आणि विश्वकोशाचा सहसंकल्पक डेनिस डिडेरॉट (1713-1784 ) यांचे वरील विधान बुद्धिप्रामाण्य आणि सत्यनिष्ठा यांना अधोरेखित करणारे आहे. भारतातही 'प्रत्यक्षम् एवम् प्रमाणम्।' म्हणणार्‍या चार्वाकांपासून ही चिकित्सा जबर किंमत मोजूनही अव्याहत चालू आहे. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, परंपराप्रामाण्य यांना शह देण्याचा प्रयत्न मध्ययुगात नाथ-महानुभाव-लिंगायत-वारकरी यांनी केला. त्याला मर्यादित क्षेत्रात व ठरावीक कालखंडात यशही मिळाले. परंतु राजसत्ता ही सनातनी धर्मव्यवस्थेशी बांधील असल्याने या संप्रदायांना सामाजिक व्यवस्थेत मोठे फेरबदल घडवून आणता आले नाहीत.       इंग्रज राजवटीत सनातन्यांचा अधिक्षेप सुरू झाला. त्रैवर्णिक पुरुषांपुरतेच मर्यादित असलेले ज्ञान काही प्रमाणात बहुजनांना खुले झाले. त्यातूनच सामाजिक क्रांतीचे प्रणेते जोतीराव फु...