पोस्ट्स

लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संत एकनाथ लिखित संतचरित्रे

इमेज
संत एकनाथ लिखित संतचरित्रे          वारकरी संप्रदाय म्हणजे पूर्वपरंपरेशी केलेली स्वयंसिद्ध बंडखोरी! संत नामदेव-ज्ञानदेवांच्या काळात संप्रदायाला आचार विचार देण्याचे महद कार्य झाले. ते करत असताना संप्रदायात सर्वश्रेष्ठ स्थान म्हणून संतपद गौरविले गेले. वारकरी संप्रदायातील संत हे अनुभवसिद्ध आणि आदर्श कर्मयोगी होते. त्यांनी स्वतःचा व्यवसाय उद्योग केलाच, परंतु त्यासोबतच आपल्या सभोवताली अज्ञान अंधकारात बुडणाऱ्या लोकांविषयी कळवळा जपला. त्यांना सन्मार्ग दाखविला. ईश्वराशी कसे नाते जोडायचे ते शिकविले. 'यज्ञ याग विधी वायाची उपाधी', असे म्हणत आचरणसुलभ भक्तिमार्ग सांगितला. प्रयत्नपूर्वक वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. या संतांनी लिहिलेले वाङ्मय म्हणजे संप्रदायाला दिलेली आधारशीला होय. तत्कालीन सनातनी ब्रह्मवृंद या संतांना त्रास देत होता. छळत होता. त्यांच्या योग्यतेबद्दल शंका उपस्थित करीत होता. अशावेळी संत मंडळींची भलामन करणे गरजेचेच होते. म्हणून वारकरी संप्रदायातील संतांनी जाणीवपूर्वक आपल्या संतमंडळाचा गौरव केलेला दिसतो. ज्ञानेश्वरादी भावंडां...

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप       स्मार्टफोन ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक क्रांतीच म्हणावी लागेल. त्यामुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट सुविधेचा वापर करणे सहज सोपे झाले. त्या पाठोपाठ अनेक प्रकारचे सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांच्या वापराचे पर्याय खुले झाले. यामध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, telegram, व्हिडिओ चॅनल, युट्युब, रिल्स, फेसबुक अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यातीलच एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ब्लॉग होय. सामान्यतः ज्या काळात छापील मासिके नियतकालिके निघत होती व अन्य पर्याय उपलब्ध नव्हते, त्या काळात फक्त मान्यवर गणले जाणारे लेखकच लिहू शकत होते आणि त्यांचे लेखन प्रकाशित होऊ शकत होते. सोशल मीडियाच्या काळात लिहायची उर्मी व इच्छाशक्ती असणारी प्रत्येक व्यक्ती लिहू लागली व तत्काळ विविध समाजमाध्यमांचा वापर करून प्रकाशित तसेच प्रसारित करू लागली. यामध्ये ब्लॉग लेखन हा सहज उपलब्ध होणारा चांगला पर्याय आहे.         ब्लॉग या शब्दाला मराठीत अनुदिनी किंवा जालपत्रिका किंवा जालनिशी असे पर्यायी शब्द आहेत. ब्लॉग (blog) हा शब्द वेब (web+log) लॉग...

कथाकथी (Story Telling)

कथाकथी (Story Telling)               गोष्टी रंगवून सांगणे आणि ऐकणे हे पूर्वापार चालत आलेले लोकसंचित आहे. गोष्टीवेल्हाळ माणसे नेहमीच इतरांना आवडतात. त्यांच्याकडे घटना, प्रसंग शब्दांच्या माध्यमातून साक्षात उभे करण्याचे सामर्थ्य असते. स्टोरी टेलिंग या इंग्रजी शब्दांसाठी मराठीत मात्र तीन भिन्न कृती अस्तित्वात असलेल्या दिसतात. त्या पुढील प्रमाणे : गोष्ट सांगणे             ही लोक परंपरेतील लोकप्रिय पद्धती आहे. अनेक जण सांगोवांगीच्या गोष्टी एकमेकांना ऐकवत असतात. यातील काही अनुभव खरे, काही खोटे असतात. मूळ घटनेला तिखट मीठ लावून रंजक बनविले जाते. या गोष्टींमधून नीती शिकविली जाते. बोध दिला जातो. या सांगितलेल्या लोककथा असतात. दंतकथा असतात. प्राणीकथा किंवा भुताखेताच्या गोष्टी देखील असतात. कधी कधी दैवतकथा देखील रंगवून सांगितल्या जातात. या सगळ्या गोष्टींचा कर्ता म्हणजेच लेखक अज्ञात असतो. एका अर्थी या गोष्टी म्हणजे समूहाची निर्मिती असते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे लोककथांचे व दंतकथांचे संचित पोचविले जाते. समाजातील बुजुर्ग माण...

तू ही तो मेरी दोस्त है...!

इमेज
  तू ही तो मेरी दोस्त है...        मानवी नातेसंबंध हा कवी गुलजार यांच्या चिंतनाचा विषय आहे. नात्यातील प्रांजळपणा, दृढता, गहराई, ओलावा या गोष्टींचे महत्त्व अनन्यसाधारण असते. परंतु त्याची जाणीव होण्यासाठी वेळ लागतो. अनुभवातून चुकतमाकत अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. आपले कोणीतरी जवळचे असावे, आपण कुणासाठी तरी जवळचे व्हावे, या गोष्टीचे मोल थोडे उशिरा लक्षात येते. कवी गुलजार सत्तरच्या दशकापासून आजपर्यंत आपल्या कवितांमधून, गाण्यांमधून विविध नात्यांचा पैस उलगडत आहेत.          ' हम ने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो।' असे एकेकाळी गुलजारजींनीच लिहिले होते. कारण त्या काळात स्त्री-पुरुषांची मैत्री, प्रेम, जवळीकता यांना समाजमान्यता नव्हती. नाती अंतःकरणापासून समजून घ्यावीत, जपावीत, पण त्यांना नाव देऊ नये. फक्त त्या नात्यातील प्रेम अनुभवावे, असा तो काळ! पण आता काळ बदलला आहे. समाजमन बदलले आहे. तरुणाई खुलेआम आपली मैत्री जाहीर करते. निभावते. कधी कधी मैत्रीचे प्रेमातही रूपांतर होते. हे सगळे समाजाने स्वीकार...

तुम आ गये हो...

इमेज
तुम आ गए हो...              जीवनसाथीची भेट हा प्रत्येकाच्या जीवनातील एक वळणबिंदू असतो. या जादुई भेटीनंतर जगण्याचे रंगरूप पालटते. जीवनाला चैतन्याचा, सौंदर्याचा स्पर्श होतो. एखाद्या शुष्क निष्प्राण पुतळ्याला प्रेमाचा स्पर्श व्हावा आणि तो साजिवंत होऊन सामोरा यावा, तसे काहीसे घडते. कवी गुलज़ारजींनी एका गीतामधून हे प्रत्ययकारी रितीने नोंदविले आहे. आँधी (१९७५) चित्रपटात संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यात हे मधुर क्षण नजाकतीने टिपले आहेत. त्याच्या/तिच्या रूपाने मूर्तिमंत प्रेम जीवनात अवतरते. जीवनाला नवी झळाळी, नवे तेज, नवे सौंदर्य लाभते. या भेटीनंतरचा जीवनप्रवास आणि भेटीपूर्वीचा जीवनप्रवास या दोन अवस्था गुलज़ार साहेबांनी तंतोतंत टिपल्या आहेत.       जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर एक अस्पष्टसा चेहरा अधून मधून मनात डोकावत असतो. या चेहऱ्याचे भास होत राहतात, पण प्रत्यक्ष भेट होत नाही. ऋतू येतात, जातात. थोडीशी निराशा, थोडीशी उदासी मनावर दाटून येते. या आशानिराशेच्या संधिकालातच ...

दिल तो बच्चा है जी...

इमेज
  दिल तो बच्चा है जी...        वयाची पन्नाशी उलटून गेलीय. मन मात्र उमदे, उत्साही आहे. तारुण्यातील अवखळ खळखळाट आता राहिलेला नाही. वाहत्या पाण्यासारखे अनावर कोसळणे, तन-मनावर उमटणारे अनेक तरंग, एका विशिष्ट बिंदूकडे खेचणारे चुंबकीय भोवरे आता राहिलेले नाहीत. अधीरता संपलीय. जगण्याला थोडा संथपणा आलाय. प्रौढ प्रगल्भता जाणवते आहे. जीवनातील ऋतू बदलाचा हा काळ.      अशा संक्रमण काळात स्वतःचा मधाळ स्वर लाभलेली एक सुहास्यवदना अचानक सामोरी येते. तिच्या बोलण्या-चालण्यातून आत्मविश्वास झळकतोय. स्वतःचे निर्णय घेण्याची प्रगल्भता जाणवतेय. पहिली नजरानजर होते आणि जणू काही नजर गच्च रुतून बसते. प्रयत्न करूनही नजर तिच्यावरून क्षणभरही हटत नाही. आपल्या वयाला हे शोभत नाही, हे कळते. परंतु हृदयाची धडकन वाढते. ती थांबता थांबत नाही. स्थळ-काळ-वय यांचे बंधन झुगारून ते तिच्याकडे ओढ घेते. तिच्या परिपक्व व्यक्तित्वाने वेडावते. कदाचित आपले हसे होईल, फसगत होईल हे कळत असूनही हृदय ते जुमानत नाही. मग सुरू होते एका अनोख्या प्रेमभावनेची दास्ताँ!   ...

ऐ ज़िन्दगी गले लगा ले ...

इमेज
ऐ ज़िन्दगी गले लगा ले ...              सामान्य माणसाच्या जीवनाकडून असणाऱ्या अपेक्षा छोट्याशाच असतात. तो आपल्या वकुबानुसार स्वप्न पाहतो. ती पूर्ण होण्यासाठी धडपडतो. जीवाचे रान करतो. परंतु जीवन म्हणजे आशा-निराशेचा खेळ! सुखदुःखाची ऊनसावली आयुष्यभर येतजात राहते. जे हवंसं असतं ते प्राप्त होतंच असं नाही. जे नजरेसमोर असतं ते आपल्या हाती गवसतं असंही नाही. वाट्याला येणारे कटू अनुभव, अपयशाचे क्षण, दुःख म्हणजे जीवन नव्हे; तर आपली छोटी छोटी स्वप्ने पूर्ण होणे, खडतर वाटचालीतून यशापर्यंत पोहोचणे म्हणजे खरे जीवन! पण हे आनंददायी क्षण वाट्याला कधी आणि किती प्रमाणात येतील हे सांगता येत नाही. माणूस मात्र सतत अशा सुंदर मौल्यवान क्षणांची प्रतीक्षा करत राहतो.        कवी गुलजारजींनी ' सदमा'(१९८३ ) चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गीतात हा जीवनानुभव खूप सूचक व अर्थपूर्णरित्या व्यक्त झालेला आहे. या गाण्यांमध्ये नायक आपल्या जीवनाशी संवाद साधतो आहे. आपली इच्छा अपेक्षा बोलून दाखवतो आहे. तो म्हणतो,  ऐ ज़िन्दगी गले लगा ले  हमने भी तेरे हर एक ग़म...

हेचि दान दे गा देवा...

इमेज
* जगद्गुरु तुकोबारायांच्या पसायदानातील मूल्यविवेक*         वारकरी संप्रदाय म्हणजे सामाजिक समता आणि अाध्यात्मिक लोकशाहीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बंडखोर प्रयोग होय. तेराव्या शतकात संत नामदेव-ज्ञानदेवांसह अनेक संतांनी स्वतःचे जीवन संकटात घालून भक्तीची पताका उंच धरली. ' यारे यारे लहान थोर। याती भलते नारी नर।। ' असे म्हणत स्त्री शूद्रातिशूद्रांना भक्तीचा मार्ग खुला केला आणि नव्या परंपरेला सुरुवात झाली. या संत नामदेव-ज्ञानदेव कृत भक्तिमार्गाची पाऊलवाट प्रशस्त करण्याचे कार्य नंतरच्या संतमांदियाळीने केले. त्यामुळेच 'ज्ञानेशाचा एका, कबीराचा शेखा आणि नामदेवाचा तुका' असे आदराने म्हटले जाऊ लागले. म्हणजेच संतांनी वारकरी संप्रदायाची एक दीर्घ परंपरा घडविली, टिकविली आणि पिढ्यान् पिढ्या कष्टकरी भावभोळ्या जनसामान्यांच्या मनात रुजविली.           ' नामदेवे केले स्वप्ना माजि जागे। सवे पांडुरंगे येऊनिया।।' असे तुकोबांनी स्वतःच लिहून ठेवले आहे. याचा अर्थ असा की संतांची पूर्वकालीन मांदियाळी उत्तरकालीन संतांना घडव...

मी रात टाकली...

इमेज
मी रात टाकली...       चांगला कवी नेहमीच कमीत कमी शब्दांत आपला आशय व्यक्त करतो. अर्थाच्या अनेक शक्यता शब्दांत आणि त्या दरम्यानच्या मोकळ्या जागांमध्ये पेरत जातो. आपल्या मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी अतिशय चपखल अर्थपूर्ण शब्द गवसणे आणि त्यांची अनोखी मांडणी करणे, हेच कवीचे वैशिष्ट्य असते. ना.धों. महानोरांनी ' जैत रे जैत ' (१९७७) या चित्रपटासाठी लिहिलेले 'मी रात टाकली' हे गीत याच पठडीतले आहे. गो. नि. दांडेकरांच्या कथेवर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला होता. या गीताला संगीत दिले आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी, तर स्वर आहे लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचा.        ना. धों. महानोर यांनी अतिशय कमीत कमी शब्दांत एक अनवट भाव पकडला आहे. ठाकर आदिवासी जमातीतील चिंधीची ही कहाणी. चिंधीला आपला भित्रा व दारुबाज नवरा आवडत नाही. म्हणून ती त्याच्याबरोबर काडीमोड घेते. जमातीच्या कायद्याप्रमाणे चिंधीच्या बापाला देज (हुुंडा) परत द्यावे लागते, पण चिंधी एका नको असलेल्या पाशातून मुक्त होते. तिची भ...

मेरा कुछ सामान...

इमेज
*मेरा कुछ सामान...*      बाहेर पावसाची झड लागून राहिली आहे. दिशा अंधुक काळवंडून गेलेल्या. थंड ओला गारवा लपेटून राहिलेला. अशा वेळी मनही थोडे कातर होते. कधी कोणाची आठवण होत राहते. मन भूतकाळात हरवून जाते. अनेक गोष्टी साठून राहिलेल्या असतात. नजरेसमोरून त्या आठवणींचे चित्रफलक सरकत जातात. दीर्घ सहवासाचा खूप आतून ओढ लावणारा प्रेमभाव शब्दांत कसा पकडायचा हा नेहमीच एक अनुत्तरित प्रश्न असतो. परंतु एखादा कवी तेही नेमकेपणाने अभिव्यक्त करताे. कवी गुलजार साहेबांचे 'इज़ाजत' चित्रपटातील हे ' मेरा कुछ सामान' गीत याचाच एक सुंदर नमुना आहे.           मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है           सावन के कुछ भीगे-भीगे दिन रखे हैं           और मेरे इक खत में लिपटी रात पड़ी है           वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो           मेरा कुछ सामान... ...

पाखरांची घरटी

इमेज
* पाखरांची घरटी *         विविध रंगांचे, विविध आकारांचे पक्षी म्हणजे निसर्गाची अदभूत निर्मिती आहे! जवळजवळ सगळेच पक्षी देखणे असतात. खूप सुरेख रंगसंगती त्यांच्या पंखांवर असते. एकाच रंगाचे कावळा, कोतवाल, चिरक, कोकीळ, पाणकावळा यासारखे अनेक पक्षी असले, तरी प्रत्येकाच्या काळ्या रंगाची छटा भिन्न असते. त्याच प्रमाणे पाखरांची घरटीही विविध रंगी, विविध ढंगी असतात. माणूस जसा बारा महिने सर्व ऋतूत सुरक्षित घरात राहतो, तसे पक्षी करत नाहीत. त्यांना घरट्याची गरज वाटते ती फक्त अंडी घालण्यासाठी. नव्यांना जन्म देण्यासाठी. त्यांचे संगोपन करण्यासाठी. त्यामुळे विणीच्या हंगामातच पाखरांची घरटी बांधायची लगबग सुरू झालेली आढळते. इतर वेळी बहुसंख्य पाखरं झाडावरच राहतात. रात्री पंखात मान मुडपून झोपी जातात. पाणपक्षी पाण्यात झोपतात, तर माळ पक्षी माळावरच डुलक्या घेतात. या सर्व पाखरांची झोप सावध असते, इतके मात्र खरे!         प्रत्येक पाखराचे घरटे वेगळ्या धाटणीचे आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. बाहेरून पाहताना पक्ष्यांचे घरटे ओबडधोबड दिसत असले, तरी आतून मात्र मऊ मुलायम आणि उबदार ...